नवी दिल्ली SC Granted Bail To Arvind Kejriwal :दिल्ली दारू घोटाळ्यात अटक असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयानं मोठा दिलासा दिला आहे. अरविंद केजरीवाल यांना दिल्ली दारू घोटाळ्यात सर्वोच्च न्यायालयानं अंतरिम जामीन मंजूर केला आहे. अरविंद केजरीवाल यांच्या याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयानं हे प्रकरण वरिष्ठ खंडपीठाकडं पाठवलं. वरिष्ठ खंडपीठात या प्रकरणाची सुनावणी होईपर्यंत अरविंद केजरीवाल जामिनावर बाहेर राहतील, असंही न्यायालयानं स्पष्ट केलं.
न्यायालयानं ठेवला होता निकाल राखून :सर्वोच्च न्यायालयात अरविंद केजरीवाल यांच्या जामीन याचिकेवर न्यायमूर्ती संजीव खन्ना यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठात सुनावणी पार पडली. मात्र यावेळी सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठानं अरविंद केजरीवाल यांच्या सुनावणीवरील निकाल राखून ठेवला. या पीठात न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांचाही समावेश होता. दिल्ली दारू घोटाळ्यातील मनी लाँड्रींग प्रकरणात ईडीनं अरविंद केजरीवाल यांच्या जामिनाला विरोध केला. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयानं 15 एप्रिलला अरविंद केजरीवाल यांच्या अटकेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर ईडीकडून उत्तर मागवलं.
अरविंद केजरीवाल यांनी दिलं होतं अटकेला आव्हान :दिल्ली दारू घोटाळ्यात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीनं अटक केली. त्यानंतर अरविंद केजरीवाल यांनी ईडीच्या अटकेविरोधात उच्च न्यायालयात आव्हान दिलं. मात्र उच्च न्यायालयानं ईडीची बाजू घेत अरविंद केजरीवाल यांना जामीन देण्यास नकार दिला. त्यामुळे अरविंद केजरीवाल यांनी दिल्ली उच्च न्यायालयाच्या 9 एप्रिलच्या आदेशाविरोधात सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयानं या प्रकरणी सुनावणी घेतली, मात्र निकाल राखून ठेवला होता. मात्र आज दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अंतरिम जामीन देण्यात आला आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीनं 21 मार्चला मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक केली.
हेही वाचा :
- दिल्ली दारू घोटाळा प्रकरण : अरविंद केजरीवाल यांना सीबीआयकडून अटक - Arvind Kejriwal Arrest By CBI
- आम्हाला अटक कराल, आमच्या विचारांना कशी करणार अटक ? अरविंद केजरीवालांचा पोलिसांना सवाल - KEJRIWAL PROTEST BJP HEADQUARTER
- "देश वाचवण्यासाठी मी तुरुंगात जातोय"; 21 दिवसांनी दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचं तिहार कारागृहात आत्मसमर्पण - CM Arvind kejriwal surrendering