महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

विवाहबंधनात अडकल्यानंतर सोनाक्षी सिन्हा-झहीर इक्बालची पहिली झलक आली समोर - Sonakshi And Zaheer Reception - SONAKSHI AND ZAHEER RECEPTION

Sonakshi Zaheer marriage अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाच्या रिसेप्शन लूकनं चाहत्यांना मोहित केले. लाल रंगाच्या बनारसी साडीवर कुंकू, लाल बांगड्या यात ती अतिशय सुंदर दिसत होती. रिसेप्शनला येत असताना सोनाक्षी आणि झहीरनं पापाराझींना सुंदर पोझ दिली.

Sonakshi And Zaheer Reception Look
सोनाक्षी सिन्हा आणि झहीरचं रिसेप्शन लूक (ANI)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 24, 2024, 8:44 AM IST

Updated : Jun 24, 2024, 8:56 AM IST

हैदराबादSonakshi Zaheer marriage सोशल मिडियावर काही दिवसांपासून चर्चेत असलेली अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा रविवारी विवाहबंधनात अडकली आहे. रविवारी संध्याकाळी बॉयफेंड झहीर इक्बालसोबत तिचं लग्न झालं. रजिस्टर पद्धतीने त्यांनी त्यांच्या नवीन नात्याची सुरुवात केली आहे. 'स्पेशल मँरेज एक्ट 1954' अन्वये या दोघांनी विवाह केला. लग्नानंतर लगेचच त्यांनी मुंबईतील दादर येथील बास्टन रेस्टॉरंटमध्ये त्यांनी रिसेप्शन पार्टी दिली. यावेळी सोनक्षी सिन्हानं लाल रंगाची साडी घातली होती.

सोनाक्षीचा खास लूक:सोनाक्षी सिन्हानं लाल रंगाची बनारसी साडी नेसली होती. तिने लाल कुंकू, लाल बांगड्या, चोकर शैलीतील हिरवा आणि सोन्याचा नेकलेस, मॅचिंग ड्रॉप इयररिंग्सने तिचा ब्राईडल लुक खास बनवला होता. सोनाक्षीनं जास्त मेकअप न करता साध्या गोष्टींकडे लक्ष दिलं. तिच्या केसात पांढऱ्या फुलांचा गजरा माळला होता. त्यामुळे तिचं लूक अजून खूलून दिसू लागला. तिच्या साडीवर गोल्डन रंगाची बारीक नक्षीकाम होतं. साडीवर थ्रीफोथ ब्लाऊज परिधान केला. विंग्ड आयलायनर, काजळ, लिपस्टिक आणि हायलाइटर तसचं मस्कऱ्यासह ती खूप सुंदर दिसत होती. झहीरनं पाढऱ्या शर्टवर मॅचिंग पॅन्ट एम्ब्रॉयडरी केलेला व्हाइट टर्टलनेक जॅकेट परिधान केलं होतं.

पापाराझींशी केला संवाद: रिसेप्शनमध्ये पोझ दिल्यानंतर सोना आणि झहीरनेही आरामात बसून पापाराझींसी संवाद साधला. रिसेप्शनमध्ये दोघेही अतिशय आनंदी दिसत आहेत. सोनाक्षीच्या लग्नाच्या लूकसाठी तिचे सर्व कौतुक होत आहे. कारण ती तिच्या कमी मेकअप लूकमध्ये खूप आकर्षक दिसत होती. त्यांच्या रिसेप्शन पार्टीमध्ये अनेक सेलिब्रिटींनीही हजेली लावली. तिने आईची साडी नेसल्याचे समोर आले तेव्हा तिचे चाहते खूप भावूक झाले. यावरून ती तिच्या आईच्या किती जवळ आहे, हे लक्षात आले.

लग्नानंतर पोस्ट शेअर: सोनाक्षीने लग्नाचा पहिला फोटो शेअर करताना सोशल मीडियावर लिहिलं, सात वर्षापूर्वी आजच्या दिवशी (२३ जून २०१७) आम्ही एकमेकांच्या डोळ्यात प्रेम पाहिलं. ते प्रेम कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. आज ते प्रेम आव्हानं आणि विजयांमध्ये आम्हाला मार्गदर्शन केलं. या क्षणापर्यत आणले. आम्हाला कुटुंबाचं आशीर्वाद मिळालं. आता आम्ही पती-पत्नी आहोत. सोनाक्षी आणि झहीर २३.०६.२०२४"

हेही वाचा

  1. सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इकबाल विवाहबद्ध, बेस्टीयनमध्ये स्वागत समारंभाचं आयोजन; पाहा फोटो - Sonakshi Sinha Zaheer Iqbal Wedding
  2. सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इकबालचं लग्न, व्हिडिओ व्हायरल - sonakshi sinha wedding
Last Updated : Jun 24, 2024, 8:56 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details