नवी दिल्ली Republic Day Parade : आज भारतानं आपला 75 वा प्रजासत्ताक दिन साजरा करत असताना, अग्निवीरांसह सर्व-महिला त्रि-सेवा दलाचं सामर्थ्य कर्तव्य पथावर दिसून आलं. .
पहिलीच वेळ : त्रि-सेवा महिला दल सेवांमधील संयुक्तता, अखंडता आणि समन्वय दर्शवतं. प्रजासत्ताक दिनी तिन्ही दलांचं प्रतिनिधीत्व करणाऱ्या महिला सैनिकांच्या तुकड्या अभिमानानं आणि उत्साहानं कूच करत असल्याची ही पहिलीच वेळ आहे. 'सेवा आणि मदत' हे त्रि सेवा महिला दलाचं ब्रीदवाक्य आहे. या टीममध्ये आर्मी, नेव्ही आणि एअर फोर्सच्या मिलिटरी पोलिस कॉर्प्सच्या महिला सैनिकांचा समावेश आहे. महिला सैनिकांना पोलीस बंडखोरीविरोधी क्षेत्रे, सियाचीन ग्लेशियर, उच्च उंचीचं क्षेत्र तसंच वाळवंटी भागात विविध युनिट्स आणि आस्थापनांमध्ये तैनात करण्यात आले आहेत. यामधील महिला सैनिकांनी विविध संयुक्त सराव आणि संयुक्त राष्ट्रांच्या मोहिमांमध्ये त्यांनी उत्कृष्ट कामगिरी केलीय.
साहसी उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग : तिन्ही सेनेतील सर्व महिला तुकडीचं नेतृत्व लष्करी पोलिसांच्या कॅप्टन संध्या आणि तीन अतिरिक्त अधिकारी कॅप्टन श्रणया राव, सब लेफ्टनंट अंशू यादव आणि फ्लाइट लेफ्टनंट सृष्टी राव यांनी केलं. स्काय डायव्हिंग आणि व्हाईट हॉर्स मोटरसायकल डिस्प्ले टीम यासारख्या साहसी उपक्रमांमध्येही त्यांनी सक्रिय सहभाग घेतलाय. अग्निपथ योजनेतून महिलांच्या प्रवेशाचा शुभारंभ झाल्यापासून वायुसेनेतील 450 अग्निवीर आणि सैन्यदलातील 1100 महिला अग्निवीरांनी प्रशिक्षण पूर्ण करुन विविध व्यवसाय आणि शाखांमध्ये प्रवेश घेतलाय.
राष्ट्रपतींच्या हस्ते ध्वजारोहण : सकाळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कर्तव्यपथावर राष्ट्रध्वज फडकावून 75 व्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याला सुरुवात केली. राष्ट्रपती मुर्मू कर्तव्य पथावर पोहोचल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचं स्वागत केलं. यासोबतच राष्ट्रगीत वाजवण्यात आलं. राष्ट्रपतींना 21 तोफांची सलामी देण्यात आली. राष्ट्रपती मुर्मू आणि या वर्षीच्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याचे प्रमुख पाहुणे फ्रेंचचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांना राष्ट्रपतींच्या अंगरक्षकांनी संरक्षण दिलं होतं. राष्ट्रपतींचे अंगरक्षक ही भारतीय सैन्यदलातील सर्वात वरिष्ठ रेजिमेंट आहे.
हेही वाचा :
- प्रजासत्ताक सोहळ्याचा अमृत महोत्सव सुरू, शौर्य, संस्कृती आणि सामर्थ्याच प्रदर्शन
- प्रजासत्ताक दिनानिमित्त पंतप्रधान मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह विविध नेत्यांनी दिल्या शुभेच्छा; वाचा कोण काय म्हणाले?
- केंद्र सरकारकडून पद्म पुरस्कारांची घोषणा; जाणून घ्या महाराष्ट्रातील कोणाचा करण्यात आला गौरव ?