हैदराबाद :जगप्रसिद्ध 'रामोजी फिल्म सिटी'मध्ये 19 डिसेंबर ते 19 जानेवारी या कालावधीत 'हिवाळी महोत्सवा'चं आयोजन करण्यात आलं आहे. या कालावधीत अनेक विशेष कार्यक्रमांच्याबरोबरच चमचमणाऱ्या बागेचा आनंद पर्यटकांना घेता येणार आहे. यात कार्निव्हल परेड, आंतरराष्ट्रीय मनोरंजनादरम्यान लाइव्ह डीजेचा आनंद पर्यटकांना घेता येणार. पर्यटकांना संध्याकाळचा आनंद लुटता यावा यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आलीय.
या वेळेत कार्यक्रमांचा आनंद घेता येणार : ज्यांना 'हिवाळी महोत्सवा'चा आनंद घ्यायचा आहे, त्यांना एक दिवसाचा दौरा, संध्याकाळ आणि इतर पॅकेजेसमध्ये सहभागी होता येणार आहे. रामोजी फिल्म सिटीत ज्यांना हिवाळी उत्सवाचा पुरेपूर आनंद लुटायचा आहे, त्यांच्यासाठी विविध आकर्षक हॉलिडे पॅकेजेस उपलब्ध आहेत. पर्यटक सकाळी 9 ते रात्री 9 या वेळेत फिल्मसिटीला भेट देण्याचा आणि खास मनोरंजनाच्या कार्यक्रमांचा आनंद घेऊ शकतात.
विशेष पॅकेजेस उपलब्ध :19 जानेवारीपर्यंत सुरू राहणार्या रामोजी विंटर फेस्ट सोहळ्यात तुम्हीही सहभागी होऊ शकता आणि अविस्मरणीय आठवणींचा खजिना तयार करू शकता. उत्सवादरम्यान, ज्यांना फिल्मसिटीत हॉटेल्समध्ये राहून या उत्सवाचा आनंद घ्यायचा आहे, त्यांच्यासाठी येथील हॉटेलमध्ये विशेष पॅकेजेस उपलब्ध आहेत.
बजेटनुसार राहण्याची व्यवस्था - तुमच्यासाठी योग्य असलेले पॅकेज निवडून तुम्ही या महोत्सवा'चा आनंद घेऊ शकता. रामोजी फिल्म सिटीमध्ये संध्याकाळी, पर्यटकांसाठी विशेष कार्यक्रमांसह लाइव्ह डीजे परफॉर्मन्स असेल. दरम्यान तुम्ही या विशेष पॅकजचा लाभ घेऊ शकता. लक्झरी हॉटेल - सितारा, कम्फर्ट हॉटेल- तारा, शांतिनिकेतन - बजेट हॉटेल, वसुंधरा व्हिला- फार्म हाऊस, ग्रीन्स इन - हॉटेल सहारा या ठिकाणी मुक्काम करण्यासाठी विशेष पॅकेजेस उपलब्ध आहेत.
हेही वाचा
- कॅरम! शासनाचा एक दुर्लक्षित खेळ; कॅरमचा जगज्जेता अद्यापही नोकरीपासून वंचित
- उस्ताद झाकीर हुसैन यांनी अमरावतीत पाचवेळा मिळवली वाहवा; वयाच्या 24 व्या वर्षी गाजवली पहिली मैफिल