महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या नालंदा विद्यापीठाच्या नवीन कॅम्पसचं वैशिष्ट्य काय? जाणून घ्या, सविस्तर - Nalanda University - NALANDA UNIVERSITY

Nalanda University: पंतप्रधान मोदींनी आज प्राचीन नालंदा विद्यापीठाजवळील नवीन कॅम्पसचं उद्घाटन केलं आहे. या कार्यक्रमात परराष्ट्रमंत्री एस जयशंकर आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यासह 17 देशांचे राजदूतही सहभागी झाले होते.

Nalanda University
Nalanda University (Etv Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 19, 2024, 12:46 PM IST

Inauguration Of Nalanda University : 1600 वर्षे जुन्या नालंदा विद्यापीठाला आज अखेर नवं रूप मिळालं आहे. नालंदा विद्यापीठ येथील नविन कॅम्पसचं अनावरण करण्यापूर्वी पीएम मोदींनी बिहारमधील प्राचीन नालंदा विद्यापीठाच्या अवशेषांना भेट दिली. तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून शपथ घेतल्यानंतर नरेंद्र मोदी यांचा हा पहिलाच बिहारचा अधिकृत दौरा आहे.

17 देशांचे राजदूत कार्यक्रमाला उपस्थित : या उद्धाटन सोहळ्याला परराष्ट्र मंत्री एस जयशंकर, बिहारचे राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर, मुख्यमंत्री नितीश कुमार आणि नालंदा विद्यापीठाचे कुलपती अरविंद पनगरिया उपस्थित होते. त्याचबरोबर ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, भूतान, ब्रुनेई, दारुसलाम, कंबोडिया, चीन, इंडोनेशिया, लाओस, मॉरिशस, म्यानमार, न्यूझीलंड, पोर्तुगाल, सिंगापूर, दक्षिण कोरिया, श्रीलंका आणि व्हिएतनाम यासह एकूण 17 देशांचे विदेशी राजदूतही उपस्थित होते.

आग पुस्तके जाळू शकते पण...: नालंदा नव्या कॅम्पसचे उद्घाटन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, "तिसऱ्यांदा शपथ घेतल्यानंतर पहिल्या 10 दिवसांत मला नालंदाला भेट देण्याची संधी मिळाली आहे. हे माझे भाग्य आहे. नालंदा हे फक्त एक नाव नाही. ती एक ओळख आणि आदराचं ठिकणा आहे. नालंदा एक मूल्य आणि मंत्र आहे. पुढं बोलताना ते असंही म्हणाले की, " आग पुस्तके जाळू शकते. पण ज्ञान नष्ट करू शकत नाही.''

नालंदा विद्यापीठाच्या कॅम्पसचं वैशिष्ट्य : नालंदाच्या प्राचीन अवशेषांच्या जागेजवळ विद्यापीठाचा नवीन परिसर बांधण्यात आला आहे. यात 2 शैक्षणिक विभाग असून 40 वर्गखोल्या आहेत. येथं 1,900 मुलांसाठी बसण्याची व्यवस्था आहे. विद्यापीठात प्रत्येकी 300 लोकांची क्षमता असलेली 2 सभागृहं आहेत. याशिवाय हजारो लोकांची क्षमता असलेलं इंटरनॅशनल सेंटर आणि ॲम्फी थिएटरही बांधण्यात आलं आहे. सुमारे 455 एकर परिसरात पसरलेल्या नवीन कॅम्पसमध्ये 1750 कोटी रुपये खर्चून नवीन इमारती बांधण्यात आल्या आहेत.

नालंदा विद्यापीठाच्या परिसरात या सुविधा : नालंदा विद्यापीठाच्या परिसरात 24 मोठ्या इमारती बांधण्यात आल्या आहेत. जलाशय, ॲम्फी थिएटर, मेडिटेशन हॉल, योग शिबिर, स्पोर्ट्स स्टेडियम, ॲथलेटिक्स ट्रॅक, ऑडिटोरियम, आउटडोअर स्पोर्ट्स स्टेडियम, जिम्नॅशियम, हॉस्पिटल, पारंपारिक वॉटर नेटवर्क, सोलर फार्म, महिलांसाठी तथागत निवास हॉल, शॉपिंग कॉम्प्लेक्स आणि फूड कोर् देखील आहे. नालंदा आंतरराष्ट्रीय विद्यापीठाची पायाभरणी तत्कालीन परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांच्या हस्ते 19 सप्टेंबर 2014 रोजी करण्यात आली होती.

हेही वाचा

  1. बिहारमध्ये नीटचा पेपर कसा फुटला? गेस्ट हाऊसमध्ये विद्यार्थ्यांना परीक्षेपूर्वीच मिळाली होती उत्तरे - NEET UG Paper Leak 2024
  2. शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! पंतप्रधान मोदी आज काशीतून किसान सन्मान योजनेचा 17 वा हप्ता करणार जारी - PM Modi Varanasi visit
  3. दार्जिलिंगमध्ये भीषण रेल्वे अपघात; कांचनजंगा एक्स्प्रेसला मालगाडीची धडक, 15 प्रवाशांचा मृत्यू - Kanchenjunga Express Accident

ABOUT THE AUTHOR

...view details