नवी दिल्ली Parliament Session :देशात 18 व्या लोकसभेच्या स्थापनेनंतर मोदी सरकार तिसऱ्या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प सादर करणार आहे. 23 जुलै रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन सभागृहात सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर करणार आहेत. संसदेचे हे अधिवेशन 22 जुलै ते 12 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात केंद्र सरकार विनियोग विधेयकही मंजूर करणार आहे. याशिवाय जम्मू-काश्मीरचा अर्थसंकल्पही सरकार मंजूर करणार आहे. .
'ही' 6 नवीन विधेयकं मांडणार : अर्धसंकल्पीय अधिवेशनात सरकारकडू 6 विधेयक मांडली जाणार आहेत. हे विधेयक अधिवेशनातच मंजूर करून घेण्याचा एनडीए सरकारचा प्रयत्न असणार आह . वित्त विधेयकाव्यतिरिक्त आपत्ती व्यवस्थापन विधेयक, बॉयलर विधेयक, भारतीय विमान विधेयक, कॉफी (प्रमोशन आणि डेव्हलपमेंट) विधेयक, डेव्हलपमेंट बिल, रबर (प्रमोशन आणि डेव्हलपमेंट) विधेयक आणि डेव्हलपमेंट विधेयक यांचा समावेश आहे.
पावसाळी अधिवेशनापूर्वी सर्वपक्षीय बैठक :संसदेच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी सरकारनं आज (21 जुलै) सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली विरोधी पक्षांचे नेते या बैठकीत सहभागी होणार आहेत. विरोधकही आपल्या मागण्या सरकारसमोर मांडणार आहेत. मात्र, लोकसभेतील संख्याबळ वाढल्यानं विरोधकांची भूमिका आक्रमक दिसत आहे.
- 'या' मुद्द्यांवरून विरोधक सरकारला घेरणार :महागाई, रेल्वे अपघात, अग्निवीर योजना, जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यात जवानांचं शहीद होणं, नीट पेपरफुटी प्रकरण, कावड यात्रेच्या मार्गावर असणाऱ्या दुकानांवर मालकाचं नाव लिहिण्याचा योगी सरकारचा निर्णय यांसह विविध मुद्द्यांवर विरोधक सरकारला घेरण्याची शक्यता या अधिवेशनात आहे.
कार्य सल्लागार समिती स्थापन :लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी संसदीय अजेंडा ठरवण्यासाठी व्यवसाय सल्लागार समितीदेखील स्थापन केली आहे. त्यात सर्व पक्षांच्या नेत्यांना स्थान देण्यात आलं आहे. अध्यक्षांच्या नेतृत्वाखालील समितीमध्ये भाजपाकडून निशिकांत दुबे, अनुराग सिंह ठाकूर, भर्त्रीहरी महताब, पी. पी. चौधरी, बिजयंत पांडा, डॉ.संजय जयस्वाल यांचा समावेश आहे. काँग्रेसकडून के. सुरेश, गौरव गोगोई, टीएमसीकडून सुदीप बंदोपाध्याय, द्रमुककडून दयानिधी मारन, शिवसेना ठाकरे पक्षाकडून अरविंद सावंत यांना स्थान देण्यात आलं आहे. लोकसभेतील विधिमंडळ कामकाजाचे वेळापत्रकही ही समिती निश्चित करण्यात येणार आहे.
हेही वाचा
- पुण्यात भाजपाचे अधिवेशन : नितीन गडकरी, अमित शाह यांची उपस्थिती - BJP convention in Pune
- बाल पोर्नोग्राफी पाहणं आयटी कायद्यानुसार गुन्हा नाही : उच्च न्यायालय - children pornography