सुलतानपूर (लखनौ) :धार्मक पर्यटनाकरिता उत्तर प्रदेशमध्ये गेलेल्या महाराष्ट्रातील भाविकांच्या बसचा भीषणम अपघात झाला. अयोध्येहून काशीला घेऊन जाणारी भाविकांची बस रविवारी रात्री वाराणसी-लखनौ महामार्गावर सफरचंदांनी भरलेल्या ट्रकला धडकली. या अपघातात 45 जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
बसमधील जखमी झालेल्या भाविकांवर ) लंबुआ येथील आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत. अपघातात नऊ गंभीर जखमी आहेत. त्यांच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील भाविक हे अयोध्येहून काशीच्या दिशेने बसनं जात होते. ही बस लंबुआ कोतवाली परिसरातील बायपासवर असलेल्या कब्रस्तानजीक रविवारी रात्री एक वाजण्याच्या सुमारास पोहोचली. त्यावेळी विरुद्ध दिशेकडून सफरचंद घेऊन जाणाऱ्या ट्रकला भाविकांच्या बसची जोरदार धडक बसली. अपघातानंतर घाबरलेल्या आणि जखमी झालेल्या प्रवाशांनी मदतीसाठी आरडाओरडा केला. यावेळी स्थानिक लोकांच्या अपघातस्थळी धाव घेतली. अपघातस्थळी रुग्णवाहिका आणि पोलीस घटनास्थळी पोहोचले. जखमी प्रवाशांना सीएचसी लंबुआ येथी आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. तेथून गंभीर जखमी झालेल्या नऊ जणांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठविण्यात आले.
- तहसीलदार देवानंद तिवारी, क्षेत्र अधिकारी अब्दुस सलाम यांनीही अपघातस्थळी पोहोचून परिस्थितीचा आढावा घेतला. जखमींवर योग्य उपचार करण्याचे आदेश दिले आहेत. बसमधील सुमारे ४५ प्रवासी जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. अपघातानंतर ट्रक जप्त करण्यात आला. ट्रक चालक फरार झाला आहे. प्राथमिक माहितीनुसार ट्रक चालकाला झोप लागल्यानं अपघात झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
हेही वाचा-
- लोखंडी गेट अंगावर पडून चिमुरड्याचा मृत्यू, खेळताना घडलेल्या दुर्घटनेचा सीसीटीव्ही आला समोर
- स्लीपर बसनं घेतला पेट, उड्या मारून प्रवाशांनी वाचविले प्राण