कुवेत Kuwait Building Fire News : कुवेतमध्ये लागलेल्या आगीत 45 भारतीयांचा मृत्यू झालानंतर त्यांचे मृतदेह घेऊन विमान भारतात येत आहे. सर्व मृतदेह त्यांच्या कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात येणार आहेत. मृतांपैकी अनेकजण केरळचे आहेत. त्यामुळं केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन देखील कोचीला पोहोचले आहेत.
केरळमधील 23 जणांचा समावेश :भारतीय दूतावासानं एक्सवर दिलेल्या माहितीनुसार, भारतीय हवाई दलाचं एक विशेष विमान कुवेतमधील आगीच्या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या 45 भारतीयांचे मृतदेह घेऊन कोचीला रवाना झालंय. या विमानात राज्यमंत्री कीर्तीवर्धन सिंह हे देखील आहेत. तर बुधवारी कुवेत येथे लागलेल्या आगीच्या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या 45 भारतीयांमध्ये केरळमधील 23, तामिळनाडूमधील 7, आंध्र प्रदेशातील 3, बिहार, ओडिशा, कर्नाटक, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, झारखंड, हरियाणा, पंजाब आणि पश्चिम बंगालमधील प्रत्येकी 1, तसंच केरळमधील 23 जणांचा समावेश आहे.
दक्षिणेकडील मंगाफ शहरात 196 स्थलांतरित कामगार राहत असलेल्या सात मजली इमारतीला बुधवारी लागलेल्या आगीत किमान 45 भारतीयांचा मृत्यू झाला. आगीचं कारण शोधण्यासाठी आणि पीडित कुटुंबांना मदत देण्यासाठी कुवेती अधिकारी अथक प्रयत्न करत आहेत. तसंच या घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र शोक व्यक्त केला. या दुर्घटनेमुळं प्रभावित झालेल्या कुटुंबांना सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन त्यांनी दिलंय. भारताचे परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री कीर्तीवर्धन सिंग यांनी 13 जून रोजी कुवेतमधील रुग्णालयांना भेट दिली. यावेळी त्यांनी मंगाफ येथील दुःखद आगीच्या घटनेनंतर उपचार घेत असलेल्या भारतीय नागरिकांशी संवाद साधला.
हेही वाचा -
- भारतीयांचे पार्थिव लवकरात लवकर मायदेशी पाठवावे-परराष्ट्रमंत्री जयशंकर यांची कुवेतला विनंती - KUWAIT BUILDING FIRE
- कुवेतमध्ये इमारतीला भीषण आग, 49 जणांचा मृत्यू; मृतांमध्ये बहुतांश भारतीय असण्याची भीती - Kuwait Building Fire