महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

जेएनयूत पुन्हा 'लाल सलाम'; विद्यार्थी संघटनेच्या चारही पदांवर 'डाव्यां'चं वर्चस्व - JNUSU ELECTION RESULT 2024

JNUSU ELECTION RESULT 2024 : जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थी परिषदेच्या निवडणुकीत पुन्हा एकदा डाव्या संघटनेनं वर्चस्व गाजवलं आहे. विद्यार्थी परिषदेच्या अध्यक्षपदी डाव्या आघाडीच्या धनंजय, तर उपाध्यक्षपदी अविजीत घोष यांनी बाजी मारली आहे.

JNUSU ELECTION RESULT 2024
जिंकलेले विद्यार्थी

By ANI

Published : Mar 25, 2024, 7:07 AM IST

नवी दिल्ली JNUSU ELECTION RESULT 2024 :जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या विद्यार्थी परिषदेच्या निवडणुकीत 'डाव्यां'नी चारही पदावर आपलं वर्चस्व गाजवलं आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनं 'डाव्या' आघाडीला जोरदार टक्कर दिली. मात्र त्यांचे इरादे डाव्या विद्यार्थी संघटनेनं उधळून लावले. त्यामुळे जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या विद्यार्थी परिषदेच्या निवडणुकीत पुन्हा लाल सलामचा नारा गाजला. निवडणूक समितीतील अनागोंदीमुळे मध्यवर्ती पॅनलच्या मतमोजणीला सात तास उशीरा सुरुवात झाली.

जेएनयूत पुन्हा लाल सलाम
जेएनयूत पुन्हा लाल सलाम

अध्यक्षपदी धनंजय, तर उपाध्यक्षपदी अविजीत घोष :विद्यार्थी परिषदेच्या अध्यक्षपदी डाव्या आघाडीच्या धनंजय, तर उपाध्यक्षपदी अविजीत घोष यांनी बाजी मारली आहे. धनंजय याला 2973 मतं पडली. तर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या उमेशचंद्र अजमीरा याला 2039 मतांनी हार पत्करावी लागली. उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत डाव्या आघाडीच्या अविजीत घोष याला 2649 मतं पडली, तर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या दीपिका शर्मा हिला 1778 मतं पडली. महासचिव पदासाठी डाव्या आघाडीच्या प्रियांशी आर्यला 3307 मत पडली, तर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या अर्जुन आनंद याला 2309 मतं पडली.

जेएनयूत पुन्हा लाल सलाम

अभाविपनं जिंकली जास्त पदं :मागील एका महिन्यापासून जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या विद्यार्थी परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी गाजत आहे. त्यामुळे जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थी संघटना जोरदार तयारी करत होत्या. सेंट्रल पॅनलची मतमोजणी सुरू होण्यापूर्वी 42 काउंसलर जागांसाठी मतमोजणी सुरू होती. ही मतमोजणी शनिवारी सकाळी सुरू होऊन ती शनिवारी रात्री उशीरापर्यंत संपली. काउंसलर पदाच्या 42 जागांचे निकाल जाहीर झाले. त्यात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनं 25 पेक्षाही जास्त जागा जिंकल्या आहेत.

काउंसलर पदावर अभाविपचा झेंडा : अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनं स्कूल ऑफ संस्कृत अँड इंडिक स्टडीज (SSIS) विभागातील 3, स्कूल ऑफ कॉम्प्युटर अँड सिस्टिमॅटिक सायन्सेस (SCSS) विभागातील 3, स्कूल ऑफ एन्व्हायर्नमेंटल स्टडीज (SES) विभागातील एक, स्कूल ऑफ कॉम्प्युटेशनल विभागातील एक, स्कूल ऑफ सायन्स अँड इंटिग्रेटिव्ह सायन्सेस (SCIS) विभागातील एक, स्कूल ऑफ नॅनो सायन्स विभागातील एक, तर अर्धवेळ अभ्यासक्रमातील एक जागाही जिंकली आहे.

हेही वाचा :

  1. Controversial Slogans In JNU : जेएनयूमधील विवादित घोषणाबाजीवर कुलगुरूंनी पोलिसांना दिले चौकशीचे आदेश
  2. Morbi incident: १३४ लोकांची हत्याच.. भाजप सरकारने राजीनामा द्यावा.. जेएनयूमध्ये विद्यार्थ्यांचं आंदोलन
  3. मानववंशशास्त्राच्या दृष्टिकोनातून देवता उच्च जातीतील नाहीत, जेएनयूच्या कुलगुरूंचा अजब दावा

ABOUT THE AUTHOR

...view details