लखनऊ : रुग्णालयातील मुलांच्या वॉर्डात आग लागून तब्बल 11 नवजात बालकांचा होरपळून मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना झांसी इथल्या वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात शुक्रवारी रात्री उशिरा घडली. आगीची घटना उघडकीस आल्यानंतर बाल वॉर्डाच्या खिडकीच्या काचा फोडून अनेक चिमुकल्यांना बाहेर काढण्यात आलं. घटनास्थळी मदत आणि बचावकार्य सुरू आहे. जिल्हाधिकाऱ्यांसह प्रशासनातील अनेक उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी घटनास्थळावर धाव घेतली. अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अथक परिश्रम घेतलं.
रुग्णालयाला लागलेल्या आगीत 11 चिमुकल्यांचा बळी :झांसी इथल्या वैद्यकीय रुग्णालयात असलेल्या बाल रुग्णालयाला शुक्रवारी रात्री आग लागली. या आगीत तब्बल 11 नवजात बालकांचा होरपळून मृत्यू झाला. या चिमुकल्यांच्या पालकांनी घटनास्थळावर मोठा आक्रोश केला. या रुग्णालयाच्या परिसरात नागरिकांनी मोठी गर्दी केली. सध्या पीडितांनी घटनास्थळावर मोठा आक्रोश केला आहे.