महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

हिमाचल प्रदेश आमदार अपात्र प्रकरण : विक्रमादित्य सिंह यांनी घेतली अपात्र ठरलेल्या आमदारांची भेट - हिमाचल आमदार अपात्र प्रकरण

Himachal Political Crisis : हिमाचल प्रदेशातील राजकीय वाद अद्यापही शांत झाला नसल्याचं स्पष्ट झालं आहे. मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी काँग्रेसच्या सहा निलंबित आमदारांची भेट घेतल्याचं स्पष्ट झालं. चंदीगडच्या एका हॉटेलमध्ये ही भेट घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Himachal Political Crisis
संपादित छायाचित्र

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 1, 2024, 2:19 PM IST

शिमला Himachal Political Crisis : हिमाचल प्रदेशमध्ये भाजपा आणि काँग्रेसच्या आमदारांमध्ये सत्तेचं राजकारण चांगलंच तापलं आहे. विधानसभेच्या अध्यक्षांनी सहा आमदारांचं निलंबन केलं आहे. त्यानंतर आता कॅबिनेट मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी चंदीगडला जाऊन एका खासगी हॉटेलमध्ये त्या सहा आमदारांची भेट घेतली. त्यामुळं हिमाचल प्रदेशात अद्यापही राजकारण शांत झालं नसल्याचं स्पष्ट झालं आहे. हिमाचल सरकारवर अद्यापही सत्ताबदलाचं संकट घोंगावतंय.

गुरुवारी विक्रमादित्य सिंह यांनी शिमल्याला जाताना चंदीगडच्या एका हॉटेलमध्ये या सहा आमदारांची भेट घेतली. त्यामुळं आता पुन्हा उलट सुलट चर्चा करण्यात येत आहेत. क्रॉस वोट केल्यानंतर या आमदारांना विधानसभा अध्यक्षांनी निलंबित केलं. या आमदारांना निलंबित केल्यानंतर देशभरात मोठी खळबळ उडाली होती.

काय आहे वीरभद्र सिंह कुटुंबीयांच्या नाराजीचं कारण : हिमाचल प्रदेशात झालेला राजकीय वाद हा वीरभद्र सिंह यांच्या पुतळा उभारण्यावरुन सुरू झाल्याची चर्चा करण्यात येत आहे. रिजच्या मैदानावर वीरभद्र सिंह यांचा पुतळा उभारणं हे वीरभद्र सिंह कुटुंबीयांच्या नाराजीचं प्रमुख मानलं जात आहे. मंत्रिमंडळ बैठकीनंतर हर्षवर्धन चौहान यांनी पत्रकार परिषदेत याबाबतची माहिती दिली. मात्र मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांनी या मागणीबाबत स्पष्टपणे काहीही सांगितलं नाही. वीरभद्र सिंह यांचा पुतळा त्यांच्या कुटुंबीयांची इच्छा असेल तिथे बसवणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.

विक्रमादित्य सिंह यांना आणले ओक ओव्हर निवास्थानी :कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार आणि प्रतिभा सिंह यांनी विक्रमादित्य सिंह यांना मोठ्या प्रयत्नानं 'ओक ओव्हर' या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी आणलं होतं. वीरभद्र सिंह यांच्या कार्यकाळात 'होली लॉज' हे सत्तेचं केंद्र झालं होतं. आता पुन्हा विक्रमादित्य सिंह यांनी 'होली लॉज' हेच सत्तेचं केंद्र करण्याची तयारी सुरू केल्याचा दावा करण्यात येत आहे.

हेही वाचा :

  1. काँग्रेस आमदार क्रॉस वोट प्रकरण; विधानसभा अध्यक्षांनी ६ काँग्रेस आमदारांना केलं अपात्र
  2. काँग्रेसला मोठा दिलासा! मंत्री विक्रमादित्य यांचा राजीनामा मागं; भाजपाचं 'ऑपरेशन लोटस' अयशस्वी

ABOUT THE AUTHOR

...view details