महाराष्ट्र

maharashtra

गुरुपौर्णिमेला का म्हणतात 'व्यास पौर्णिमा'? जाणून घ्या, गुरुच्या पुजेची पद्धत - Guru Purnima 2024

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 21, 2024, 8:32 AM IST

Updated : Jul 21, 2024, 9:29 AM IST

Guru Purnima 2024 आज सर्वत्र गुरुपौर्णिमा म्हणून साजरा केला जात आहे. आपल्या जीवनात गुरुचे अन्यनसाधारण महत्व आहे. तर मग गुरुपौर्णिमेला गुरुंची पूजा कशी करावी, हे जाणून घेऊ.

Guru Purnima 2024
गुरुपौर्णिमा (ETV Bharat)

हैदराबाद Guru Purnima 2024: "गुरु ब्रह्मा गुरु विष्णु, गुरु देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म, तस्मै श्री गुरुवे नमः... धर्मग्रंथांमध्ये गुरुंनाही देवाप्रमाणे मानलं गेलं आहे. यामुळे भारतात गुरुपूजेचे अधिक महत्व आहे. या दिवशी दान आणि गुरूंना गुरुदक्षिणा दिली जाते. तसेच गुरुंची आणि आपल्या आराध्य देवी-देवतांची पूजा केली जाते.

गुरुपौर्णिमा कधी असते आणि तिचे विशेष महत्त्व का आहे? हिंदू पंचांगानुसार आषाढ शुल्क पौर्णिमेच्या दिवशी गुरुपौर्णिमा साजरी केली जाते. पंडित आत्माराम शास्त्री यांनी सांगितलं की, धर्मग्रंथानुसार महर्षी वेद व्यास यांचा जन्म गुरुपौर्णिमेला झाला. महर्षी वेदव्यास यांना महाभारत, पुराण आणि वेदांचे रचियते (लेखक) मानले जातात. त्यांनी मानवजातीला प्रथम वेदांची ओळख करुन दिली. त्यामुळे त्यांना प्रथम गुरु मानले जाते. त्यांच्या जन्मदिनानिमित्त गुरुपौर्णिमा साजरी केली जाते. त्यामुळे गुरुपौर्णिमेला 'व्यास पौर्णिमा' असंही म्हणतात. गुरुपौर्णिमेच्या दिवशी शिक्षकांचा आदर करणे आणि त्यांना गुरुदक्षिणा देणे अत्यंत महत्वाचे आहे. असे मानले जाते की गुरु, गुरुसमान ज्येष्ठांना आदर आणि सन्मान देऊन कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. 'गुरु गोविंद दोघ खडे काके लागु पाये बलिहारी गुरु आपने गोविंद दियो बताये' असेही म्हटले आहे. याचा अर्थ गुरू हाच माणसाला देवासमोर आणतो. भगवंताची माहिती फक्त गुरूच देतात. त्यामुळे गुरुची तुलना देवाच्याबरोबर मानले जाते.

या दिवशी भगवान विष्णू किंवा शालिग्रामची पूजा करा:गुरु म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे नेणे. गुरू तुम्हाला अंधारातून म्हणजे संकटातून प्रकाशाकडे म्हणजे यशाकडे घेऊन जातो. महर्षी वेदव्यास यांनी मानवजातीला प्रथमच चार वेदांचे ज्ञान देऊन त्यांचा परिचय करून दिला, असे म्हणतात. वेदव्यास हा भगवान विष्णूचा अवतारदेखील मानले जातात. त्यामुळे गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुंच्या पूजेबरोबरच भगवान विष्णू किंवा भगवान शालिग्रामचीही पूजा केली जाते. जेणेकरून गुरु रूपातील भगवान विष्णूही प्रसन्न होऊ शकतात.

गुरुपौर्णिमेला पूजा कशी करावी, जाणून घ्या पद्धत: पंडित आत्माराम शास्त्री यांनी सांगितले की, "गुरुपौर्णिमेनिमित्त ब्राह्म मुहूर्तावर जाऊन अंघोळीसोबतच व्रतही करता येते. गुरु दीक्षा घेतली असेल त्याने आपल्या गुरुंकडे जाऊन गुरुंना आपल्या क्षमतेनुसार वस्त्र, फळे आणि भेटवस्तू देऊन त्यांची पूजा करावी. यामुळे गुरुपौर्णिमेचा विशेष लाभ होतो. ज्यांनी गुरु दीक्षा घेतली नाही, ते महर्षी वेदव्यास यांची गुरु म्हणून त्यांच्या घरातील पूजा खोलीत पूजा करू शकतात.

हेही वाचा

  1. शिर्डीत 3 दिवस चालणाऱ्या गुरूपौर्णिमा उत्सवाला सुरुवात; पाहा व्हिडिओ - Gurupurnima Festival Shirdi
  2. साईंच्या शिर्डीत असा होणार तीन दिवसीय गुरुपौर्णिमा उत्सव साजरा, भाविकांसाठी मंदिर राहणार रात्रभर खुलं - Gurupurnima Festival Shirdi
Last Updated : Jul 21, 2024, 9:29 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details