महाराष्ट्र

maharashtra

खैरताबाद बाप्पाच्या दर्शनाला लोटला जनसागर: यावर्षी भाविकांनी अर्पण केलं 'इतकं' दान - Khairatabad Ganeshotsav 2024

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 17, 2024, 11:11 AM IST

Khairatabad Ganeshotsav 2024 : हैदराबादमधील खैरताबाद इथला गणपती बाप्पा देशभरात सुप्रसिद्ध आहे. खैरताबादच्या बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी देशभरातील भाविक हजेरी लावतात. यावर्षी खैरताबादच्या बाप्पाला तब्बल 70 लाखाचं दान भाविकांनी अर्पण केलं आहे.

Khairatabad Ganeshotsav 2024
खैरताबादचा बाप्पा (ETV Bharat)

हैदराबाद Khairatabad Ganeshotsav 2024 : खैरताबादचा बाप्पा देशभरात चांगलाच सुप्रसिद्ध आहे. खैरताबाद इथल्या गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी देशभरातील भाविकांनी मोठी गर्दी केली. खैरताबादच्या गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी देशभरातून भाविक येतात. यावर्षी खैरताबादच्या बाप्पाला भाविकांनी भरभरुन दान दिलं आहे. यावर्षी भाविकांनी खैरताबादच्या गणपती बाप्पाला तब्बल 70 लाख रुपयाचं दान केलं. त्यासह प्रायोजकांनी दिलेल्या जाहिरातीद्वारे 40 लाखाचं उत्पन्न मिळालं आहे. पहिल्यांदाच सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या निगराणीखाली भाविकांनी दिलेल्या दानाची मोजणी करण्यात आली.

खैरताबादचा बाप्पा (ETV Bharat)

खैरताबादचा गणपती बाप्पा तब्बल 70 फूट उंचीचा :खैरताबाद इथला गणपती बाप्पा हा तब्बल 70 फूट उंचीचा आहे. आपल्या उंचीमुळे खैरताबादचा बाप्पा देशभरात सुप्रसिद्ध आहे. खैरताबादचा बाप्पा 2023 मध्ये जगातील सगळ्यात मोठा बाप्पा म्हणून गणला गेला. त्यामुळे जगभरातील भाविकांना खैरताबादच्या बाप्पाच्या दर्शनाची आस लागत आहे. या वर्षी खैरताबादच्या बाप्पाचं हे 70 व वर्ष आहे, त्यामुळे विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.

कशी आहे शोभायात्रेची तयारी :खैरताबाद इथल्या बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली. आज सकाळी 7 वाजता खैरताबादच्या बाप्पाची भव्य मिरवणूक निघणार आहे. बाप्पाच्या मिरवणुकीचं तल्ली उड्डाणपुलावरून टँक बंदकडं निघमार आहे. मिरवणूक सुरळीत पार पडावी यासाठी प्रशासनानं चोख बंदोबस्त ठेवला आहे.

बाप्पाच्या बाळापूर लाडूचा लिलाव :बाप्पाच्या लाडूच्या लिलावाची इथं 30 वर्षांपासूनची परंपरा आहे. हा लाडू बाळापूर लाडू म्हणून सुप्रसिद्ध आहे. या लाडूच्या लिलावालाही आता चांगलाच वेग आला आहे. 2023 च्या लिलावामध्ये जोरदार स्पर्धा होती, त्यामध्ये सहभागी होण्यासाठी बोलीदारांना आगाऊ रोख रक्कम जमा करणं बंधनकारक होतं. मागील वर्षीच्या लिलावात बाळापूर लाडूची तब्बल 27 लाख रुपये मिळाली. यावर्षीही लाडूला 30 लाखाची बोली लागण्याची शक्यता आहे.

हेही वाचा :

  1. लाडक्या गणरायाला आज निरोप... मुंबईत 24,000 हून अधिक पोलीस तैनात - Ganesh visarjan 2024
  2. पुण्यातील विसर्जन मिरवणुकीला 'अशी' होणार सुरवात, मानाच्या गणपती मंडळात 'ही' पथके होणार सहभागी - Pune Ganesh Visarjan

ABOUT THE AUTHOR

...view details