हैदराबाद Drinking Water While Standing Disadvantages : पाणी पिणं आपल्यासाठी किती महत्त्वाचं आहे हे सर्वांनाच माहीत आहे. तज्ञांच्या मते, माणूस अन्नाशिवाय सुमारे 3 आठवडे जगू शकतो. परंतु पाण्याशिवाय 3 दिवसांहून अधिक जगू शकत नाही. त्यामुळं पाणी ही आपल्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. पण पाणी आपल्यासाठी जीवनदायी असलं तरी ते चुकीच्या पद्धतीनं प्यायल्यास समस्या निर्माण होऊ शकतात. अनेकांना उभं राहून पाणी पिण्याची सवय असते. मात्र, या सवयीमुळं मोठ्या आजारांना निमंत्रण दिलं जातं. त्यामुळं बसून पाणी का प्यावं? त्यामागचं शास्त्र काय? याविषयी आपण जाणून घेऊया.
उभं राहून पाणी पिण्याचे दुष्परिणाम :
- डॉक्टरांच्या मतं, उभे राहून पाणी पिल्यानं त्याचा आरोग्यावर वाईट परिणाम होतो. जेव्हा तुम्ही उभं राहता तेव्हा तुमच्या शरीरावर आणि पेशीवर तणाव येतो. अशा परिस्थितीत, जेव्हा तुम्ही पाणी पिता, तेव्हा तुमच्या शरीरात पाणी वेगानं वाहू लागतं. त्यामुळे द्रवपदार्थांचं संतुलन बिघडतं.
- याशिवाय जर तुम्ही उभं राहून पाणी प्याल तर त्याचा तुमच्या पचनसंस्थेवरही वाईट परिणाम होतो. याचं कारण असं की, जेव्हा तुम्ही उभं राहून पाणी पितात तेव्हा गुरुत्वाकर्षणामुळं ते अन्ननलिकेतून आणि थेट पोटाच्या खालच्या भागापर्यंत मोठ्या ताकदीनं आणि वेगानं पोहोचतं. हे अत्यंत हानिकारक आहे. डॉक्टरांच्या मते, उभं राहून पाणी प्यायल्यानं मज्जातंतूंमध्ये तणाव निर्माण होतो. त्यामुळं द्रवांचं संतुलन बिघडतं. त्यामुळे शरीरातील विषारी पदार्थ वाढतात.
- जसं आपण म्हणालो की उभं राहून पाणी प्यायल्यानं शरीरातील द्रवपदार्थांचं संतुलन बिघडतं. तसंच काहीवेळा यामुळं सांध्यामध्ये द्रव साचतो. त्यामुळे बहुतेक जणांना संधिवात होतो. उभं राहून पाणी प्यायल्यानं सांध्यांना मोठी हानी होते, असं डॉक्टरांचं म्हणणं आहे.
- जेव्हा तुम्ही उभे राहून पाणी पितात तेव्हा पाण्यातील पोषक आणि जीवनसत्त्वं तुमच्या यकृत आणि पचनसंस्थेपर्यंत पोहोचत नाहीत. कारण उभं राहून पाणी प्यायल्यानं ते तुमच्या प्रणालीतून खूप वेगानं जातं. त्यामुळं तुमच्या फुफ्फुस आणि हृदयाचं कार्य धोक्यात येऊ शकतं. उभं राहून पाणी प्यायल्यानं ऑक्सिजनची पातळीदेखील खालावते.
- डॉक्टर सांगतात की, जेव्हा आपण बसतो तेव्हा आपली किडनी चांगली काम करते. अशा स्थितीत जेव्हा आपण उभं राहून पाणी पितो तेव्हा जास्त दाबानं द्रव न गाळता थेट पोटाच्या खालच्या भागात जातो. त्यामुळं पाण्यात असलेली अशुद्धता मूत्राशयात जमा होते. त्याचा किडनीच्या कार्यावर परिणाम होतो. अशा स्थितीत किडनीशी संबंधित अनेक आजार होण्याची भीती असते.