लखनऊ Lindy Cameron meets Yogi Adityanath :ब्रिटिश उच्चायुक्त लिंडी कॅमेरॉन यांनी गुरुवारी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. ब्रिटन आणि भारत यांच्यातील मैत्री पुढं नेल्याबद्दल उच्चायुक्त लिन्डी कॅमेरॉन यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे आभार मानले. योगी आदित्यनाथ यांच्यासोबतच्या या बैठकीचं वर्णन करताना उच्चायुक्त लिन्डी कॅमेरॉन यांनी लिहिलं आहे की, "त्यांनी उत्तरप्रदेशातील उच्च शिक्षण, व्यवसाय, इलेक्ट्रिक वाहनं आणि इतर व्यवसायातील संधीबाबत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी सविस्तर चर्चा केली." मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ब्रिटनच्या उच्चायुक्तांसोबतच्या भेटीचा फोटोही सोशल मीडियावर शेअर केला.
उच्चायुक्त लिंडी कॅमेरॉन आणि योगी आदित्यनाथ यांची भेट :मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ब्रिटीश उच्चायुक्त लिंडी कॅमरॉन यांच्यासोबत भेट घेतली आहे. त्यांच्या भेटीचा फोटो योगी आदित्यनाथ यांनी आपल्या सोशल माध्यमात शेयर केला. यावेळी त्यांनी "आज ब्रिटिश उच्चायुक्त लिंडी कॅमेरॉन यांच्याशी लखनऊमधील निवासस्थानी भेट घेतली." सीएम योगींच्या या पोस्टला उत्तर देताना, ब्रिटीश उच्चायुक्त लिंडी कॅमेरॉन यांनी लिहिलं, "मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या पहिल्या भेटीदरम्यान मौल्यवान माहितीचं आदान प्रदान झालं. भारत आणि ब्रिटनमधील मैत्री पुढं नेल्याबद्दल धन्यवाद, आपण उच्च शिक्षण, व्यवसायाच्या संधी, इलेक्ट्रिक वाहनं आणि व्यवसायात खूप मैत्री पुढे नेणार आहोत."