महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

हाथरस सत्संग चेंगराचेंगरी : 124 भाविकांच्या बळीनंतर भोलेबाबा पहिल्यांदा पोहोचला गावात, दर्शनासाठी भाविकांच्या लागल्या रांगा - Hathras Satsang Stampede

Hathras Satsang Stampede : हाथरस सत्संग चेंगराचेंगरी प्रकरणात तब्बल 124 भाविकांचा बळी गेला आहे. ही घटना घडल्यानंतर भोलेबाबा फरार झाला होता. मात्र बुधवारी भोलेबाबा त्याच्या जन्मगावातील आश्रमात पोहोचला. यावेळी भाविकांनी त्याचं जंगी स्वात करुन दर्शनासाठी रांगा लावल्या आहेत.

Hathras Satsang Stampede
संग्रहित छायाचित्र (ETV Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 18, 2024, 10:22 AM IST

124 भाविकांच्या बळीनंतर भोलेबाबा पहिल्यांदा पोहोचला गावात (Reporter)

लखनऊ Hathras Satsang Stampede : हाथरस सत्संग चेंगराचेंगरी प्रकरणात तब्बल 124 भाविकांचा बळी गेल्यानं मोठी खळबळ उडाली. या चेंगराचेंगरीला कारणीभूत असलेल्या भोलेबाबा उर्फ सूरजपाल बुधवारी त्याच्या कागंज जिल्ह्यातील पटियाली परिसरात असलेल्या बहादूरनगर या जन्मगावी पोहोचला. भोलेबाबा घरी आल्याचं वृत्त कळताच त्याच्या भाविकांनी मोठी गर्दी केली. भोलेबाबा याचं त्याच्या भाविकांनी जंगी स्वागत केलं. यावेळी भोलेबाबा याच्यासोबत त्याचे वकील ए पी सिंह यांची देखील उपस्थिती होती.

आश्रमाबाहेर भाविकांची मोठी गर्दी :हाथरस सत्संग चेंगराचेंगरी झाल्यानंतर भोलेबाबा फरार होता. मात्र बुधवारी भोलेबाबा त्याच्या जन्मगावातील आश्रमात पोहोचला. यावेळी भोलेबाबा आश्रमात आल्याचं समजताच आश्रमाबाहेर भाविकांची मोठी गर्दी झाली. सूरजपाल उर्फ भोलेबाबा याच्या आगमनानं त्याच्या भक्तांमध्ये आनंदाची लाट उसळली. भोलेबाबा बहादूरनगर गावात पोहोचताच आजूबाजूच्या परिसरातील त्याच्या भक्तांनी आश्रमाकडं धाव घेतली.

एसआयटी तपासावर पूर्ण विश्वास :भोलेबाबासोबत त्याचे वकील एपी यांची उपस्थिती होती. यावेळी वकील ए पी सिंह म्हणाले की, "डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार बोलेबाबा आरोग्याच्या अडचणीमुळे जन्मस्थान असलेल्या बहादुरनगर आश्रमात पोहोचले आहेत. भोलेबाबा हाथरस सत्संगात मृत्यू झालेल्या भाविकांच्या कुटुंबीयांप्रती सहानुभूती व्यक्त करतो. सर्व जिल्हा समित्यांना मृत आणि जखमींच्या कुटुंबीयांना सर्वतोपरी मदत करण्याची भोलेबाबानं विनंती केली आहे. मृतांच्या मुलांच्या शिक्षणाची व्यवस्था करण्याचं त्यांनी सांगितलं आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी स्थापन केलेल्या एसआयटी तपासावर माझा पूर्ण विश्वास आहे. त्याचबरोबर भोलेबाबा यांच्या अनुयायांनी भेटण्यासाठी गावात येऊ नये," असं आवाहनही वकील सिंह यांनी केलं आहे.

हेही वाचा :

  1. हाथरस सत्संग चेंगराचेंगरी : भोलेबाबाचा सेवक देव प्रकाश मधुकर याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या, बाबाचा शोध सुरूच - Hathras Stampede
  2. हाथरस सत्संग चेंगराचेंगरी; भोलेबाबा दुधानं करायचा अंघोळ, त्याच दुधाची खीर बनवून वाटला जायचा प्रसाद - Hathras Satsang Stampede
  3. हाथरस सत्संग चेंगराचेंगरी प्रकरण : राहुल गांधींनी घेतली हाथरस चेंगराचेंगरीतील पीडितांच्या नातेवाईकांची भेट - Hathras Stampede

ABOUT THE AUTHOR

...view details