हैदराबाद Benefits Of Walking : व्यग्र जीवनशैलीमुळे मानवाचं आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे. कित्येक जण सकाळी फिरायला जाणं किंवा व्यायाम करणं टाळतात. पण तंदुरुस्त रहायचं असेल तर चालण्यासारखा उत्तम व्यायाम नाही. ज्या लोकांना व्यायाम करण्याचा कंटाळा येतो त्यांच्यासाठी तर किमान चालणं हा एक सर्वोत्तम पर्याय आहे. चालण्याने हृदयाचं आरोग्य सुधारतं आणि कॅलरी बर्न होण्यासही मदत होते. याशिवाय चालण्याने वजन नियंत्रित राहण्यास मदत होते. तसंच रक्तदाब संतुलित राखण्यासाठी आणि रक्तातील साखरेचं नियमन सुधारण्यासाठी विशिष्ट वेळ आणि गतीनं चालणं प्रभावी ठरू शकतं.
हृदय मजबूत होतं : 'चालणे' हा हृदय मजबूत करणारा एरोबिक व्यायाम आहे. बदलत्या खानपान आणि झोपण्याच्या अयोग्य पद्धतीमुळे ओबेसिटीचं प्रमाण वाढलं आहे. अशातच वजन कमी करणे फार महत्त्वाचं आहे. जर तुम्ही लठ्ठपणा कमी करण्यासाठी चालत असाल दररोज किती पावलं चालणं गरजेचं आहे, हे जाणून घ्यावं.
रोज किती पावलं चालावी? :हेल्थलाइनच्या अभ्यासानुसारक, निरोगी राहण्याकरिता प्रौढांनी दररोज 10,000 पावलं चालणं गरजेचं आहे. 60 वर्षांपर्यंतच्या लोकांसाठी, दररोज 8,000-10,000 पावलं चालणं तर साठीच्या पुढच्या लोकांनी 60 वर्षांनंतर 6000-8000 पावलं आरोग्यासाठी उपकारक आहे.
- चालण्याचे फायदे
पचनक्रिया सुधारते :चालण्याने पचनास मदत होते. तसंच वजनही मर्यादेत रहातं. जेवल्यानंतर चालण्याने पोट फुगणे, बद्धकोष्ठता, पोटदुखी आणि पचनाशी संबंधित इतर समस्यांपासून देखील आराम मिळतो. कॅलरीज बर्न होतात. तसंच स्थायू बळकट होतात.
मधुमेह नियंत्रित राहतो : अनेक अभ्यासावरून असं लक्षात आलं आहे की, चालण्यामुळे शरीरातील साखेरची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत होते. त्यामुळे शरीरात फॅट साचत नाही. जे वजन कमी करण्यासाठी फार महत्त्वाचं आहे.