महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

300 कोटींच्या घोटाळ्यातील फरार आरोपीला वृंदावनमधून अटक, साधूच्या वेशात राहून देत होता हुलकावणी - Accused In Guise Monk Mathura

Accused In Guise Monk : महाराष्ट्रात 300 कोटींचा गंडा घालून वर्षभरापासून फरार असलेला आरोपी मथुरेत साधूच्या वेशात राहत होता. या आरोपीचा शोध घेत बीड पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

Beed Jijau Maasaheb Multi State 300 Crore Scam Maharashtra Police arrested accused from Mathura
आरोपी बबन शिंदे (ETV Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 27, 2024, 9:31 AM IST

मथुरा Accused In Guise Monk : 300 कोटी रुपयांच्या घोटाळ्यातील आरोपीला बीड पोलिसांनी वृंदावन येथून अटक केली आहे. हा आरोपी साधूच्या वेशात राहत होता. एका प्रसिद्ध मंदिराला त्यानं आपला आधार बनवला होता. काही महिन्यांपूर्वीच तो वृंदावनला आला होता. पोलिसांपासून वाचण्यासाठी त्यानं स्वत:चा वेश बदलला होता. बबन शिंदे असं या आरोपीचं नावं असून त्याच्यावर अनेक राज्यात कोट्यवधींचा घोटाळा केल्याचा आरोप आहे.

आरोपी वर्षभरापासून होता फरार : महाराष्ट्र पोलीस बबन शिंदेचा बराच काळ शोध घेत होते. आरोपी बबन कधी दिल्लीत, कधी नेपाळमध्ये, कधी ओरिसात तर कधी आसाममध्ये ठिकाण बदलून राहत होता. बबन शिंदेला पकडण्यासाठी बीड पोलिसांनी त्याचं लोकेशन ट्रेस करत वृंदावन गाठलं. 25 सप्टेंबर रोजी त्याला अटक केली. महाराष्ट्राशिवाय इतर अनेक जिल्ह्यांतही बबनवर गुन्हे दाखल आहेत. तसंच वर्षभरापासून तो फरार होता.

एसपी सिटी अरविंद कुमार यांनी दिली माहिती (ETV Bharat)


आरोपीला अटक :या संदर्भात माध्यमांशी संवाद साधत असतानामथुरा शहराचे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अरविंद कुमार यांनी सांगितलं की, "महाराष्ट्रातील गुन्हे शाखेचे पोलीस इथं आले होते. याप्रकरणी शिवाजी नगर पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. मथुरा पोलीस आणि बीड पोलिसांच्या संयुक्त कारवाईत बबनला अटक करण्यात आली. त्याचं ठिकाण शोधल्यानंतर 24 सप्टेंबरलाच टीम तेथे पोहोचली. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी कोर्टातून रिमांड घेऊन आरोपीला ताब्यात घेतलं आहे. आरोपी वृंदावन येथील एका मंदिराजवळ वेश बदलून राहत होता. महाराष्ट्र पोलिसांनी वृंदावन पोलिसांना सहकार्य मागितलं होतं. वृंदावन पोलीस ठाण्यानं पूर्ण सहकार्य केले. संयुक्त कारवाईत आरोपीला अटक करण्यात आली", असं अरविंद कुमार म्हणाले.

हेही वाचा -

  1. चीनचा मोठा घोटाळा ईडीकडून उघडकीस! ४०० कोटींच्या फसवणूक प्रकरणात ४ जणांना अटक, २५ कोटी जप्त - GAMING APP SCAM CASE
  2. नोकरीत बढती करण्याकरिता रेल्वे कर्मचाऱ्यानं रचला भयानक कट, पोलिसही चक्रावले! - Train Derailment Bid
  3. शीरासह धड वेगळे करून हत्या करणाऱ्या सुरक्षा रक्षकाला सांगलीतून अटक, गुन्ह्याचं कारण धक्कादायक - Thane crime

ABOUT THE AUTHOR

...view details