भिलवाडा (राजस्थान) Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीबाबत दुसरा टप्पा मतदान आज होत आहे. मतदारांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळतोय. अनेक ठिकाणी लोक लग्नाच्या विधीपूर्वी मतदान करत आहेत. तोच दुसरीकडं मतदानादरम्यान एका 80 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झालाय.
लग्नाचं वऱ्हाड घेऊन मतदान केंद्रावर : उदयपूरच्या मावळी विधानसभा मतदारसंघातील मतदानादरम्यान एक वर लग्नाच्या मिरवणुकीपूर्वी ढोल-ताशा घेऊन संपूर्ण लग्नाच्या मिरवणुकीसह मतदान करण्यासाठी देबारी येथील मतदान केंद्रावर पोहोचला. देबारीचे रहिवासी जितेंद्र वैष्णव यांची मिरवणूक देबारीपासून 50 किमी अंतरावर असलेल्या राजसमंद जिल्ह्यातील देलवाडा इथं जाण्यापूर्वी मतदान केंद्रावर पोहोचली. मतदानाच्या दिवसापूर्वी उपसरपंच चंदनसिंग देवरा यांनी लग्नातील सर्व पाहुण्यांना आधी मतदान करा आणि मग लग्न करा, असा संदेश दिला. संपूर्ण मिरवणूक वाद्यांसह मतदानासाठी पोहोचली तेव्हा मतदान केंद्रावरील संपूर्ण वातावरण उत्साही झालं होतं.
मतदानादरम्यान वृद्ध व्यक्तीचा मृत्यू : दुसऱ्या घटनेत लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानादरम्यान भिलवाडा शहराजवळील मतदान केंद्रावर मतदान केल्यावर लगेच एका 80 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. पोलिसांनी वृद्धाचा मृतदेह शवागारात ठेवला आहे. वयोवृद्ध व्यक्तीचा मृत्यू नेमका कशामुळं झाला याबाबत अद्याप कोणताही खुलासा झालेला नाही.
मृत्यूचं कारण अद्याप अस्पष्ट : भाजपा नेते चेतन यांनी सांगितलं की, शहरातील रहिवासी असलेले 80 वर्षीय छगन बगेला भिलवाडा शहराजवळील छिपा येथील नोहरा मतदान केंद्र क्रमांक 7 इथं मतदान केंद्रावर पोहोचले होते. मतदान केंद्रावर रांगेत उभं राहून त्यांनी मतदान केलं. त्यानंतर ते मतदान केंद्राच्या आवारात अचानक खाली पडले आणि त्यांचा मृत्यू झाला. यानंतर मतदान केंद्रावर उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांनी तातडीनं त्या वृद्धाला रुग्णालयात नेलं. तिथं डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केलं. पोलिसांनी वृद्धाचा मृतदेह ताब्यात घेऊन शवागारात ठेवलाय. मात्र वृद्धाचा मृत्यू कसा झाला याबाबत अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.
हेही वाचा :
- लग्नाआधी वऱ्हाड पोहोचलं मतदान केंद्रावर, बजाविला मतदानाचा हक्क - Amravat lok sabha voting
- पाचव्या टप्प्यातील मतदानासाठी आजपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात; राज्यात 'या' जागांवर होणार मतदान - Lok Sabha Election