महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

29 वर्षीय तरूणीची हत्या, मृतदेहाचे 32 तुकडे करून ठेवले फ्रीजमध्ये - Bengaluru Girl Murder Case - BENGALURU GIRL MURDER CASE

Bengaluru Girl Murder Case : दिल्लीत घडलेल्या श्रद्धा वालकर हत्याकांडाची बंगळुरूमध्ये पुनरावृत्‍ती घडल्‍याचा धक्‍कादायक प्रकार समोर आलाय. एका तरूणीची निर्घृण हत्या करून तिच्या मृतदेहाचे तुकडे फ्रिजमध्ये ठेवण्यात आले. या घटनेनं खळबळ उडाली आहे, जाणून घेऊया संपूर्ण प्रकरण…

Bengaluru Girl Murder Case
तरूणीची निर्घृण हत्या (Source - ETV Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 21, 2024, 10:43 PM IST

बंगळुरू Bengaluru Girl Murder Case : श्रद्धा हत्याकांडानं संपूर्ण देश हादरला होता, आता बंगळुरूमधून अशा निर्घृण हत्येचं प्रकरण समोर आलंय. इथं एका 29 वर्षीय तरूणीची हत्या करण्यात आली. हत्या केल्यानंतर मृतदेहाचे तुकडे करून रेफ्रिजरेटरमध्ये ठेवण्यात आले. हत्येची ही खळबळजनक घटना व्यालीकवळ पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या मुनेश्वरनगर येथं घडली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तरूणी विवाहित असून वैयक्तिक कारणास्तव ती पती हुकुमसिंग राणा आणि मुलापासून वेगळी राहत होती. गेल्या पाच महिन्यांपासून ती भाड्याच्या घरात वेगळी राहत होती. तरूणीची आई आणि कुटुंबीय घरी आले असता तिचा फोन बंद असल्यानं त्यांना संशय आला. त्यांनंतर ही घटना उघडकीस आली. वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि एफएसएल पथक घटनास्थळी दाखल होत तपास करत आहेत.

मृतदेहाचे तुकडे करून फ्रीजमध्ये ठेवले : अतिरिक्त पोलीस आयुक्त सतीश कुमार यांनी घटनास्थळी पत्रकारांशी बोलताना या घटनेची माहिती दिली. तरूणी दुसऱ्या राज्यातून आली होतीय ती बेंगळुरूमध्ये भाड्याच्या घरात राहत होती. तरूणीची हत्या केल्यानंतर तिच्या मृतदेहाचे तुकडे करून रेफ्रिजरेटरमध्ये ठेवण्यात आले. घटनेचा संपूर्ण तपास झाल्यानंतरच संपूर्ण माहिती समोर येईल, असं पोलिसांनी सांगितलं.

तुकड्यांवर रसायनांची फवारणी : तरूणीची हत्या काही दिवसांपूर्वीच झाल्याचं पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आलं. संशयित मारेकऱ्यानं मृतदेहाचे 32 तुकडे केले आणि रेफ्रिजरेटरमध्ये ठेवले. दुर्गंध येऊ नये, म्हणून मृतदेहाच्या तुकड्यांवर रसायनांची फवारणी केली. हत्या केल्यानंतर आरोपीनं घराला कुलूप लावून पळ काढला. तरूणीचा फोन 2 सप्टेंबर रोजी बंद होता. खून त्याच दिवशी झाला असावा, अशी माहिती पोलिसांनी दिलीय.

सकाळी जायची अन् रात्री घरी यायची :स्थानिक रहिवासी मेरीनं या घटनेबाबत सांगितलं की, मृत तरूणीसोबत नुकतीच आपली मैत्री झाली होती. ती घरी एकटीच राहत होती. तिचा मोठा भाऊ तिच्यासोबत काही दिवस येथं राहायला आला होता. तो गेल्यानंतर ती घरात एकटीच राहत होती. रोज सकाळी ती 9.30 वाजता घरून निघायची आणि रात्री 10 नंतर घरी परतायची. आज सकाळच्या दरम्यान तिची आई आणि मोठी बहीण आली होती. घरात गेल्यावर त्यांना दुर्गंध येऊ लागला. आई आणि बहिणीनं फ्रीज उघडल्यावर त्यांना मृतदेहाचे तुकडे दिसले. व्यालिकवल पोलीस आता या घटनेचा तपास करत आहेत.

हेही वाचा

  1. 59व्या वर्षी 'तेजस' विमान चालवणारे अमरप्रीत सिंग देशाचे नवीन हवाई दल प्रमुख - AP Singh New Air Force chief
  2. बीएसएफ जवानांची बस दरीत कोसळली; चार जवानांचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक - BSF Bus Accident in Budgam
  3. तिरुपती लाडूच्या तुपात जनावरांची चरबी असल्याची सरकारी लॅबकडून पुष्टी, नेमकी भेसळ कशी झाली? - tirupati laddu news

ABOUT THE AUTHOR

...view details