महाराष्ट्र

maharashtra

आगीत घर जळून खाक, लाखो रुपयांचे नुकसान

By

Published : Dec 20, 2020, 10:33 PM IST

राहत्या घराला आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची घटना जत तालुक्यातील मोठेवाडीमध्ये घडली आहे. मोठेवाडी परिसरातील शेतवस्तीवर असलेल्या घराला ही आग लागली. भाऊसाहेब सरक यांच्या मालकीचे हे घर आहे. या घटनेत सरक यांचे मोठे नुकसान झाले आहे.

fire burned the house
आगीत घर जळून खाक

सांगली-राहत्या घराला आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची घटना जत तालुक्यातील मोठेवाडीमध्ये घडली आहे. मोठेवाडी परिसरातील शेतवस्तीवर असलेल्या घराला ही आग लागली. भाऊसाहेब सरक यांच्या मालकीचे हे घर आहे. या घटनेत सरक यांचे मोठे नुकसान झाले आहे.

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, मोठेवाडी परिसरातील शेतवस्तीवर भाऊसाहेब सरक यांचे झोपडीवजा घर आहे. या घरात भाऊसाहेब सरक त्यांची पत्नी, मुले आणि आई वडिल असा परिवार राहातो. सध्या ऊसतोडणीचा हंगाम सुरू असल्याने भाऊसाहेब सरग हे आपल्या पत्नीसोबत ऊसतोडणीसाठी गेले होते. याचदरम्यान ही आग लागली.

आगीत दीड लाखांचे नुकसान

रविवार सकाळी ११ च्या सुमारास अचानक सरक यांच्या घराला आग लागली. या आगीत संसार उपयोगी साहित्यासह एक पोते बाजरी, एक पोते गहू, एक तोळे सोने व रोख रक्कम जळून खाक झाले आहे. या घटनेत दीड लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. तलाठ्याकडून नुकसानीचा पंचनामा करण्यात आला असून, सरक यांना तातडीने मदत मिळावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details