महाराष्ट्र

maharashtra

विजेच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू; खेडच्या तिफनवाडीमधील घटना

By

Published : May 3, 2021, 10:41 AM IST

सद्यस्थितीत उन्हाळी हंगामातील पिके शेतकऱ्यांच्या शेतात डौलत असून वेळेवर पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांची धांदल सुरू आहे. तिफनवाडी येथे शेताला पाणी देण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला आहे.

Tifanwadi Farmer electric shock death
तिफनवाडी शेतकरी मृत्यू बातमी

पुणे -खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील तिफनवाडी व परिसरात रात्री १२ ते दुसऱ्या दिवशी सकाळी १० वाजेपर्यंत शेतीसाठी विद्युत पुरवठा करण्यात येतो. सद्यस्थितीत उन्हाळी हंगामातील पिके शेतकऱ्यांच्या शेतात डौलत असून वेळेवर पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांची धांदल सुरू आहे. तिफनवाडी येथे शेताला पाणी देण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. अविनाश काशिनाथ कडलग (वय 42) असे या शेतकऱ्याचे नाव आहे.

विजेचा झटका लागून शेतकऱ्याचा मृत्यू झाला

शेतकऱ्यांच्या चर्चेनुसार, तिफनवाडी येथील शेतकरी अविनाश कडलग हे पहाटे पाच वाजता आपल्या शेतीतील पिकांना पाणी देण्यासाठी गेले होते. मात्र, खूप वेळ ते परत घरी न आल्याने त्यांची पत्नी सुवर्णा या शेताकडे त्यांना पाहण्याकरता आल्या. त्यावेळी अविनाश मोटर पंपाच्या बाजूला पाण्यात पडलेले त्यांना आढळले. झालेल्या घटनेबाबत त्यांनी तातडीने गावचे पोलीस पाटील व परिसरातील नागरिकांना कळवले. अविनाश यांना विजेचा धक्का बसल्याचे लक्षात आल्यानंतर तातडीने मुख्य वीजप्रवाह बंद करून त्यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.

ABOUT THE AUTHOR

...view details