महाराष्ट्र

maharashtra

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीत घेतला विकास कामांचा आढावा..!

By

Published : Jan 24, 2021, 10:35 PM IST

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सायंबाचीवाडी येथील सुशोभित केलेल्या पाझर तालावास भेट दिली. सुशोभीत केलेल्या पाझर तलावाचे काम पाहून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी समाधान व्यक्त केले. पाझर तलावाच्या सभोवती ओपन जिम आणि प्ले ग्राउंड तयार करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

बारामती
बारामती

बारामती (पुणे) - तालुक्यात सुरू असलेली विविध विकासकामे गतीने पूर्ण करा, तसेच विकासकामे दर्जेदार पद्धतीने करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी आज दिले.

बारामती तालुक्यातील विविध विकासकामांबाबतची आढावा बैठक उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली येथील विद्या प्रतिष्ठानच्या सभागृहात पार पडली. यावेळी नगराध्यक्षा पोर्णिमा तावरे, पंचायत समिती सभापती नीता बारवकर, उपमुख्यमंत्री कार्यालयाचे सहसचिव नंदकुमार काटकर, अपर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, बांधकाम विभागाचे मुख्य कार्यकारी अभियंता अतुल चव्हाण, महावितरणचे मुख्य अभियंता सुनिल पावडे, उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, उपमुख्यमंत्री कार्यालयाचे विशेष कार्य अधिकारी हनुमंत पाटील, तहसीलदार विजय पाटील, गटविकास अधिकारी राहुल काळभोर, नगरपालिकेचे मुख्याधिकारी किरणराज यादव, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता विश्वास ओव्हाळ, सिल्व्हर ज्युबली रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सदानंद काळे यांच्यासह ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर, नगरसेवक सचिन सातव, संभाजी होळकर तसेच विविध विभागाचे अधिकारी, पदाधिकारी उपस्थित होते.

सायंबाचीवाडी येथील सुशोभित केलेल्या पाझर तालावास भेट...

या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्व विभागातील अधिकाऱ्यांकडून बारामती शहरातील तसेच तालुक्यात सुरू असलेल्या विविध विकासकामांची माहिती घेतली. विकासकामे दर्जेदार करावीत कामे वेळेत करावीत, कोणत्याही अधिकाऱ्यांनी कामात दुर्लक्ष करू नये, आवश्यक त्या ठिकाणी वनविभागाची परवानगी घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सायंबाचीवाडी येथील सुशोभित केलेल्या पाझर तालावास भेट दिली. सुशोभीत केलेल्या पाझर तलावाचे काम पाहून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी समाधान व्यक्त केले. पाझर तलावाच्या सभोवती ओपन जिम आणि प्ले ग्राउंड तयार करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. यावेळी गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्याचबरोबर पदाधिकारी आणि विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

इमारतीच्या कामाची पाहणी करून अधिकाऱ्यांना दिल्या सूचना..

त्यानंतर काऱ्हाटी येथील कृषि उद्योग मूल शिक्षण संस्थेच्या 'आयटीआय' इमारतीच्या कामाची पाहणी त्यांनी केली. सुपे येथील नियोजित मार्केट, पोलीस ठाण्याच्या जागेची पाहणी करुन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संबंधित पदाधिकारी आणि अधिकारी यांना सूचना दिल्या,त्यानंतर ग्रामीण रुग्णालय व विद्या प्रतिष्ठानच्या शाळेच्या इमारतीच्या सुरु असलेल्या कामांची पाहणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.

ABOUT THE AUTHOR

...view details