मुंबई :डेंजर मॅन या नावाने पाठवलेल्या मेलमध्ये एनआयएने काही तपशील तपास यंत्रणांना दिला होता. त्यानंतर मुंबई पोलिसांसह अन्य तपास यंत्रणांची झोपच उडाली होती. महाराष्ट्र एटीएस आणि मध्यप्रदेश पोलीस एकत्रितपणे सरफराज याची चौकशी करत आहे. त्याच्या चौकशीत धक्कादायक खुलासा आला आहे. तो 41 वर्षांचा असून त्याच्या पासपोर्टवर 2018 - 2019 दरम्यान तो चीनला गेला असल्याचा शिक्का देखील आहे. त्याच्या पासपोर्टचा अधिक तपशील तपास यंत्रणांकडून जमा केला जात असल्याची माहिती पोलीस सूत्राने दिली आहे.
आकसापोटी मेल केल्याची शक्यता :चीनमधील महिलेशी सर्फराजने लग्न केले होते. त्यानंतर तिच्याशी घटस्फोट घेत असल्याच्या आकसापोटी तिने हा मेल केला असावा अशी शक्यता सर्फराजने तपास यंत्रणांकडे वर्तवली आहे. सरफराज मेमन मध्य प्रदेशमध्ये असल्याची माहिती महाराष्ट्र एटीएसकडून मध्य प्रदेश पोलिसांना मिळाली होती. यातून तपासाची चक्रे वेगाने फिरली. सरफराज मेमन हा आयएसआयचा सदस्य असल्याची चर्चा आहे. सरफराजने मी दहशतवादी नसल्याचे पोलिसांना सांगितलेले आहे. तपास यंत्रणांनी केलेल्या चौकशीत सरफराज मेमनने सांगितले की, तो कामानिमित्त चीन आणि हॉंगकॉंग येथे गेले काही वर्ष राहण्यास होता. सर्फराजची अगोदरच दोन लग्न झालेली असताना त्याने चीनमधील महिलेची तिसरे लग्न केले होते.
सरफराज मेमनची चार लग्न :दोघांचे खटके उडू लागल्याने सरफराजने घटस्फोट घेण्याचे ठरवले. मात्र चीनमधील महिलेचा घटस्फोट देण्यास विरोध होता. त्यानंतर सरफराज चीनमधून मध्य प्रदेशातील इंदोर येथे आला. इंदूरमध्ये आल्यानंतर त्याने चौथे लग्न केले. सरफराज मेमनच्या पत्नीचा विरोध असताना देखील तो घटस्फोट देत असल्याचा राग मनात धरून तिने हा मेल बदनाम करण्यासाठी केला असावा असा धक्कादायक खुलासा सरफराज यांने चौकशीत केला आहे. तो इंग्रजी आणि चिनी भाषा बोलत असल्याचे देखील सूत्रांनी सांगितले.