महाराष्ट्र

maharashtra

Jayashree Patil In Sessions Court : जयश्री पाटील यांची अटकपूर्व जामिनासाठी मुंबई सत्र न्यायालयात धाव

By

Published : Apr 18, 2022, 2:30 PM IST

सिल्वर ओक हल्ला प्रकरणातील (Silver Oak Attack Case) आरोपी अ‍ॅड. जयश्री पाटील (Add. Jayashree Patil) यांनी अटकपूर्व जामिन (for pre-arrest bail) मिळावा यासाठी मुंबई सत्र न्यायालयात (Mumbai Sessions Court) अप्पर सत्र न्यायाधीश आर एम सादराणी यांच्या समोर याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर तातडीची सुनावणी करावी अशी मांगणी करण्यात आली आहे.

Jayashree Patil
जयश्री पाटील

मुंबई:शरद पवार यांचे निवासस्थान असलेल्यासिल्वर ओक या निवासस्थानावर एसटी कामगारांनी केलेल्या हल्ल्या प्रकरणी आरोपी असलेल्या अ‍ॅड. जयश्री पाटील यांनी अटकपूर्व जामिनासाठी मुंबई सत्र न्यायालयात धाव घेत दाखल केली आहे. अप्पर सत्र न्यायाधीश आर एम सादराणी यांच्या समोर या याचिकेची सुनावणी होणार आहे. या याचिकेवर तातडीची सुनावणीची करण्याची मांगणी करण्यात आली आहे.

वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारने दिलेले पोलीस संरक्षण गुणरत्न सदावर्ते यांच्या पत्नी जयश्री पाटील- सदावर्ते यांनी सोडले . मुंबईच्या गावदेवी पोलिसांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावरील हल्ल्याप्रकरणी ( Silver Oak Attack Case ) एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांना 8 एप्रिल रोजी अटक केली. सध्या गुणरत्न सदावर्ते सातारा पोलिसांच्या कोठडी आहेत.

एसटी कर्मचाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी केलेल्या हल्ला प्रकरणात जयश्री पाटील यादेखील आरोपी असून, सध्या त्या पसार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. सदावर्ते यांना 8 एप्रिलला अटक केल्यानंतर 9 एप्रिल रोजी जयश्री पाटील यांनी राज्य सरकारने दिलेले संरक्षण सोडले आहे. जयश्री पाटील त्यांच्याविरोधात गावदेवी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांना पसार दाखवण्यात आले आहे.

हेही वाचा : Custody Of Nawab Malik : नवाब मलिक यांचा कोठडीतील मुक्काम वाढला

ABOUT THE AUTHOR

...view details