मुंबई :सर सेनापती संताजी घोरपडे कारखान्याबाबतचे आर्थिक गैरव्यवहार केला गेला. यामध्ये राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांचा सहभाग असल्याचा कथित आरोप केला गेला. या संदर्भात विनायक कुलकर्णी या व्यक्तीने त्यांच्या विरोधात एफआयआर दाखल केली होती. त्यानंतर तपासाची चक्रे वेगाने फिरली तसेच अंमलबजावणी संचलनालयाने त्यांच्या कार्यालय आणि घर येथे अनेक धाडी देखील घातल्या होत्या. त्याबाबतची हसन मुश्रीफ यांची महत्त्वाची चौकशी सुरू आहे.
चौकशी आणि तपासणी : चौकशी करीत असताना अंमलबजावणी संचलनालय हे कायदे आणि नियम बाजूला ठेवून जबरदस्तीने कारवाई करीत असल्याची तक्रार हसन मुश्रीफ यांनी फेब्रुवारी 2022 मध्ये उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे यांच्या खंडपीठाकडे केली होती. त्यामुळे त्यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर जबरदस्तीने कोणतीही चौकशी संदर्भातली कारवाई होऊ नये. चौकशी आणि तपासणी सुरू राहील, असे म्हणत त्यांना दिलासा दिला होता.
उच्च न्यायालयामध्ये धाव : तसेच मुंबई सत्र न्यायालयामध्ये विशेष पीएमएलए न्यायालयात याबाबत देखील खटला सुनावणी सुरू होती. त्यामध्ये हसन मुश्रीफ यांचे तीनही मुले तसेच कथित सीए महेश गुरव यांच्या संदर्भात तिथे सुनावणी अद्यापही सुरू आहे. मात्र हसन मुश्रीफ यांच्याबाबतचा निकाल परवा सत्र न्यायालयाने दिला. त्यात त्यांना केवळ दोनच दिवसांसाठी अंतरिम संरक्षण दिले होते. त्यानंतर त्यांना अटक होण्याची शक्यता होती, म्हणून हसन मुश्रीफ यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली.