महाराष्ट्र

maharashtra

ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना पुजाराने मोडला इंग्लंडच्या क्रिकेटपटूचा 'रेकॉर्ड'

By

Published : Dec 18, 2020, 9:53 AM IST

अ‌ॅडलेड ओव्हल येथे झालेल्या पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवशी पुजाराने १६० चेंडूत ४३ धावा केल्या. यासह त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटीच्या २८ डावांत त्याने ३६०९ चेंडू खेळले आहेत. तर, इंग्लंडचा फलंदाज जो रूटने ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटीत ३६०७ चेंडू खेळत ५९६३ धावा केल्या आहेत.

AUS vs IND, 1st Test: Cheteshwar Pujara breaks Joe Root's this record
ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना पुजाराने मोडला इंग्लंडच्या क्रिकेटपटूचा 'रेकॉर्ड'

अ‌ॅडलेड -भारताच्या कसोटी संघाचा फलंदाज चेतेश्वर पुजाराला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या सामन्यात अर्धशतक झळकावता आले नाही. मात्र, त्याच्या खेळीमुळे एका खास विक्रमाची नोंद झाली आहे. गेल्या १० वर्षात ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक चेंडू खेळणाऱ्यांध्ये पुजारा अव्वल फलंदाज ठरला आहे.

हेही वाचा -मेस्सी-रोनाल्डोचा पाडाव करत लेवंडोवस्कीने पटकावला सर्वोत्तम फुटबॉलपटूचा पुरस्कार

अ‌ॅडलेड ओव्हल येथे झालेल्या पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवशी पुजाराने १६० चेंडूत ४३ धावा केल्या. यासह त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटीच्या २८ डावांत ३६०९ चेंडू खेळले. तर, इंग्लंडचा फलंदाज जो रूटने ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटीत ३६०७ चेंडू खेळत ५९६३ धावा केल्या आहेत. भारतीय कर्णधार विराट कोहलीने ऑस्ट्रेलियाविरुद्ध ३११५ तर, माजी क्रिकेटपटू अलिस्टर कुकने ३२७४ चेंडू खेळले आहेत.

गुलाबी चेंडूने खेळवण्यात येणाऱ्या या कसोटी सामन्यात पुजाराने संयमी सुरुवात केली. चहापानाला काही अवधी उरला असताना फिरकीपटू नाथन लायनने पुजाराला बाद केले. ''अ‌ॅडलेडवर खेळताना फलंदाजाला संयम बाळगणे आणि खेळपट्टीवर जास्त वेळ घालवणे महत्त्वाचे असते. तुम्ही तुमचे फटके खेळून धावा करू शकता, अशा प्रकारची ही सपाट खेळपट्टी नक्कीच नाही'', असे पुजाराने सांगितले.

भारताच्या पहिल्या दिवशी दोनशेपार धावा -

भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान बॉर्डर-गावस्कर चषक कसोटी मालिकेतील पहिला सामना येथे सुरू आहे. पहिल्या डावात प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाने पहिल्या दिवसात ६ बाद २३३ धावा फलकावर लावल्या. कर्णधार विराट कोहलीने ७४ धावांची शानदार खेळी केली. शतकाकडे वाटचाल सुरू असताना तो धावबाद झाला. नाणेफेक जिंकून भारताने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details