ETV Bharat / sports

"कांस्य पदकाचा वेध घेणारा स्वप्नील महाराष्ट्राचा अभिमान", मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसह राजकीय नेत्यांनी केलं अभिनंदन - Swapnil Kusale - SWAPNIL KUSALE

Swapnil Kusale Won Bronze Medal : पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये आज (1 ऑगस्ट) सहाव्या दिवशी भारताला आणखी एक पदक मिळालंय. कोल्हापूरचा सुपुत्र स्वप्नील कुसाळेनं पुरुषांच्या 50 मीटर एअर रायफल 3 पोझिशनच्या अंतिम फेरीत तिसऱ्या स्थानी राहात कांस्यपदकाला गवसणी घातली. या कामगिरीनंतर स्वप्नीलचं विविध स्तरातून अभिनंदन केलं जातय.

Paris Olympics 2024 Shooting Swapnil Kusale from Kolhapur won bronze medal political leaders reaction
स्वप्नील कुसाळे (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 1, 2024, 5:17 PM IST

मुंबई Swapnil Kusale Won Bronze Medal : कोल्हापूरचा सुपुत्र स्वप्नील कुसाळेनं पुरुषांच्या 50 मीटर एअर रायफल 3 पोझिशनच्या अंतिम फेरीत तिसऱ्या स्थानी राहात कांस्यपदकाला गवसणी घातली. या ऑलिम्पिकमधील हे भारताचं तिसरं पदक ठरलंय. यापूर्वी मनु भाकरनं एकेरीत आणि मिश्रमध्ये भारताला कांस्यपदक मिळवून दिलं. विशेष म्हणजे पुरुषांच्या 50 मीटर एअर रायफल 3 पोझिशनमध्ये पदक मिळवणारा स्वप्नील हा पहिलाच भारतीय खेळाडू ठरलाय. त्यानं एकूण 451.4 गुण मिळवत कांस्यपदकाला गवसणी घातली. यानंतर स्वप्नीलचं राज्य तसंच देशभरातून अभिनंदन केलं जातय.

मुख्यमंत्र्यांनी दिल्या शुभेच्छा : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये नेमबाजीत कांस्यपदकाचा वेध घेणारा स्वप्नील कुसाळे महाराष्ट्राचा अभिमान आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वप्नीलचं अभिनंदन केलय. तसंच स्वप्नीलमुळं कुस्तीमध्ये भारतासाठी वैयक्तिक असं पहिलं पदक पटकावणाऱ्या खाशाबा जाधव यांचं स्मरण झालं. तब्बल 72 वर्षांनी स्वप्नीलनं महाराष्ट्रासाठी या पदकाचा वेध घेऊन, तशाच पद्धतीचा आनंद आणि उत्साह राज्यातील क्रीडा क्षेत्रासाठी निर्माण केलाय. कोल्हापूर जिल्ह्यात नेमबाजीची एक मोठी परंपरा आहे. ही परंपरा स्वप्नीलनं कायम राखली असून कांबळवाडीसारख्या ग्रामीण भागातून येऊन स्वप्नीलनं आपलं राज्य आणि देशाचं नाव आंतरराष्ट्रीयस्तरावर झळकवलय. देशासाठी वैयक्तिक पदकाची कमाई करताना, स्वप्नीलनं महाराष्ट्राचा क्रीडा क्षेत्रातील गौरव वाढवलाय. स्वप्नीलच्या या यशात त्याचे कुटुंबीय, प्रशिक्षक, मार्गदर्शक यांचं मोलाचं योगदान आहे. या सर्वांचे महाराष्ट्रातील तमाम जनतेच्यावतीनं अभिनंदन, असं नमूद करून मुख्यमंत्र्यानी यापुढंही स्वप्नीलच्या वाटचालीसाठी आवश्यक असं सर्व सहकार्य केलं जाईल, अशी ग्वाही दिलीय.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले? : यासंदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधत असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "महाराष्ट्रासाठी अतिशय आनंदाची गोष्ट आहे की स्वप्नील कुसाळे यांनी नेमबाजीमध्ये कास्यपदक मिळवलय. 1952 मध्ये खाशाबा जाधव यांनी ऑलिम्पिकचं पहिलं मेडल भारतासाठी मिळवलं होतं. ते महाराष्ट्राचे होते. त्यानंतर आता स्वप्नील कुसाळे यांना हे पदक मिळालय म्हणून मी त्यांचं अभिनंदन करतो. त्यांनी महाराष्ट्राचा आणि देशाचा मान वाढवलाय. ते रेल्वेमध्ये तिकीट कलेक्टर आहेत. मला विश्वास आहे की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री लवकरच त्यांच्या सन्मानासाठी योग्य ती घोषणा करतील."

क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांनीही केलं अभिनंदन : राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी देखील स्वप्नील कुसाळेचं अभिनंदन केलय. ते म्हणाले, "कोल्हापूरच्या स्वप्नील कुसाळेनं पॅरिस ऑलिम्पिक 2024 स्पर्धेत इतिहास रचला. त्यानं ऑलिम्पिकमध्ये 50 मीटर रायफल 3 पोझिशन प्रकारात आज चमकदार कामगिरी करत कांस्य पदक मिळवलंय. राज्य शासनानं स्वप्नीलसह ऑलिम्पिक स्पर्धेसाठी राज्यातील सर्व खेळाडूंना सरावासाठी 50 लाख रूपये दिले होते", असं ते म्हणाले.

हेही वाचा -

  1. अभिनव बिंद्राला पाहण्यासाठी सोडली होती बारावीची परिक्षा, महाराष्ट्राच्या 'धोनी'नं कसं जिंकलं पॅरिस? - Paris Olympics 2024
  2. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आज कोल्हापुरचा सुपुत्र रचणार इतिहास? दिवसभरात 'हे' खेळाडू गाजवणार पॅरिस - Paris Olympics 2024
  3. रेल्वेत टीसी ते ऑलिम्पिक..! पॅरिस ऑलिम्पिकमध्ये नेमबाजीत अंतिम फेरी गाठणाऱ्या स्वप्नीलचे वडील म्हणाले, तो नक्कीच... - Paris Olympics 2024

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.