महाराष्ट्र

maharashtra

पाकिस्तान वि. झिम्बाब्वे : मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी अलीम दार असणार मैदानी पंच

By

Published : Oct 21, 2020, 3:11 PM IST

''तीनही एकदिवसीय सामन्यात अलीम दार हे मैदानी पंच असतील आणि त्यानंतर पहिल्या आणि तिसर्‍या टी-२० सामन्यात, तर दुसर्‍या टी-२० सामन्यात ते तिसऱ्या पंचांची भूमिका पार पाडतील. या मालिकेसाठी मॅच रेफरी म्हणून आयसीसीने जावेद मलिक यांची नियुक्ती केली आहे'', असे पीसीबीने सांगितले.

Aleem dar has been assigned on-field duties for pakistan-zimbabwe series
पाकिस्तान वि. झिम्बाब्वे : मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी अलीम दार असणार मैदानी पंच

लाहोर - पाकिस्तान आणि झिम्बाब्वे यांच्यातील मर्यादित षटकांच्या मालिकेच्या सहापैकी पाच सामन्यांसाठी अनुभवी पंच अलीम दार यांना मैदानी पंच म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. झिम्बाब्वेचा संघ ३० ऑक्टोबर, १ नोव्हेंबर आणि ३ नोव्हेंबरला रोजी रावळपिंडी येथे एकदिवसीय मालिका खेळणार आहे. ही मालिका वर्ल्डकप सुपर लीगचा एक भाग आहे. त्यानंतर उभय संघांत ७, ८ आणि १० नोव्हेंबरला लाहोरमध्ये टी-२० सामने खेळले जाणार आहेत.

''तीनही एकदिवसीय सामन्यात अलीम दार हे मैदानी पंच असतील आणि त्यानंतर पहिल्या आणि तिसर्‍या टी-२० सामन्यात, तर दुसर्‍या टी-२० सामन्यात ते तिसऱ्या पंचांची भूमिका पार पाडतील. या मालिकेसाठी मॅच रेफरी म्हणून आयसीसीने जावेद मलिक यांची नियुक्ती केली आहे'', असे पीसीबीने सांगितले.

अलीम दार यांच्याव्यतिरिक्त पीसीबीने एहसान रझा, आसिफ याकूब, राशिद रियाझ आणि शोबाब रझा या पंचांचीही नियुक्ती केली आहे. एहसान यांचा हा ५०वा, अलीम यांचा ४६वा आणि शोझाब यांचा ३६वा सामना असेल.

ABOUT THE AUTHOR

...view details