महाराष्ट्र

maharashtra

कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाकरिता १ लाख डोस मिळण्याची विप्रोला अपेक्षा

By

Published : May 19, 2021, 8:58 PM IST

बंगळुरूस्थित विप्रो कंपनीने देशातील आघाडीच्या रुग्णालय आणि ऑनलाईन डिलिव्हरी करणाऱ्या कंपन्यांबरोबर करार केले आहेत. या करारामधून वेगवान पद्धतीने कर्मचाऱ्यांकरिता कोरोना लस मिळविण्याचा विप्रोचा प्रयत्न आहे.

Wipro
विप्रो

नवी दिल्ली - देशभरात कोरोना लशींचा तुटवडा असल्याने लसीकरण मोहिम कासवगतीने सुरू आहे. आयटी कंपनी विप्रोला जूनमध्ये कर्मचारी व त्यांच्या कुटुंबासाठी १ लाख कोरोना लशींचे डोस मिळण्याची अपेक्षा आहे.

बंगळुरूस्थित विप्रो कंपनीने देशातील आघाडीच्या रुग्णालय आणि ऑनलाईन डिलिव्हरी करणाऱ्या कंपन्यांबरोबर करार केले आहेत. या करारामधून वेगवान पद्धतीने कर्मचाऱ्यांकरिता कोरोना लस मिळविण्याचा विप्रोचा प्रयत्न आहे.

हेही वाचा-कोरोना महामारीचा महिलांच्या मानसिक आरोग्यासह कामाच्या समाधानावर परिणाम

लवकरात लवकर लसीकरण करण्याचे उद्दिष्ट-

जर लशी उपलब्ध झाल्या तर भागीदारीतून जूनच्या सुरुवातीला १ लाख डोस मिळणार आहेत, असे विप्रोने म्हटले आहे. या लसीमध्ये कोव्हिशिल्ड, कोव्हॅक्सिन आणि स्पूटनिक व्ही या लशींचा समावेश आहे. हे लशींचे डोस खास विप्रोचे कर्मचारी, त्यांची पत्नी व मुलांना देण्यात येणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे. त्यामागे सर्व कर्मचाऱ्यांचे लवकरात लवकर लसीकरण करण्याचे उद्दिष्ट आहे.

हेही वाचा-टीसीएसचे सीईओ राजेश गोपीनाथन यांना मिळाले २०.३६ कोटी वार्षिक वेतन !

कर्मचारी व त्यांच्या कुटुंबांना मोफत लस-

कोरोनाची दुसरी लाट असताना लसीकरणाचे महत्त्व सांगण्याची गरज नाही. कर्मचारी व त्यांच्या कुटुंबांना मोफत लस दिली जाणार आहे. ही लस कंपनीच्या कॅम्पसमध्ये तसेच भागीदारी केलेल्या रुग्णालयांमध्ये दिली जाणार आहे. विप्रोने भागीदारी केलेल्या रुग्णालयांचे नावे सांगितली नाहीत. मात्र, देशभरात त्या ग्रुपची १४० ठिकाणी रुग्णालये असल्याचे कंपनीने म्हटले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details