ETV Bharat / business

सुरक्षेच्या उल्लंघनावरुन एलन मस्क यांचा संताप : ओपनए आय डीलवरुन सर्व अ‍ॅपल उपकरणांवर बंदी घालण्याची धमकी - Elon Musk Threatens To Apple - ELON MUSK THREATENS TO APPLE

Elon Musk Threatens To Apple : अ‍ॅपल आणि ओपन एआय या दोन कंपन्यात करार झाल्यानं एक्सचे मालक आणि टेस्लाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एलन मस्क हे चांगलेच संतापले. एलन मस्क यांनी अ‍ॅपलला हा करार न थांबवल्यास आपल्या कंपनीतील सगळ्या अ‍ॅपलच्या उपकरणांवर बंदी घालण्याची धमकी दिली.

Elon Musk Threatens To Apple
टेस्लाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एलन मस्क (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 11, 2024, 8:56 AM IST

कॅलिफोर्निया Elon Musk Threatens To Apple : आयफोन निर्माता कंपनीचे टीम कुक यांनी ओपन एआय सोबत सोमवारी भागीदारी जाहीर केली. मात्र टीम कुक यांनी एक्सवर शेअर केलेल्या या पोस्टमुळे एक्सचे मालक आणि टेस्लाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एलन मस्क यांचा चांगलाच तिळपापड झाला. त्यांनी यावेळी अ‍ॅपलला चांगलंच फटकारलं. सुरक्षा उल्लंघनाशी कधीही तडजोड केली जाणार नाही. ओपन एआयचं हे अ‍ॅप तत्काळ हटवा, अन्यथा मी आमच्या कंपनीमधील अ‍ॅपल उपकरणांवर बंदी घालेल, अशी धमकी एलन मस्क यांनी दिली. एलन मस्क यांनी एक्सवर याबाबतचं आपलं मत स्पष्ट केलं. यावेळी त्यांनी युझरच्या सुरक्षेविषयी चिंता व्यक्त केली.

अ‍ॅपलच्या सगळ्या उपकरणांवर घालणार बंदी : ओपन एआय आणि अ‍ॅपल यांच्यात झालेल्या कराराची माहिती अ‍ॅपलचे मुख्य कार्यकारी अधिकारी टीम कुक यांनी एक्स या सोशल माध्यमांवर दिली. यावर एक्सचे मालक आणि टेस्लाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एलन मस्क यांनी जोरदार टीका केली. अ‍ॅपल आणि ओपन एआयच्या कराराला एलन मस्क यांनी विरोध केला. याची गरज नाही, सुरक्षेचं उल्लंघन अजित खपवून घेतलं जाणार नाही. हे भयानक स्पायवेअर थांबवा, नाहीतर मी माझ्या कंपनीतून अ‍ॅपलच्या सगळ्या उपकरणांवर बंदी घालेन, अशी धमकी एलन मस्क यांनी दिली.

काय म्हणाले होते टीम कुक : अ‍ॅपलचे मुख्य कार्यकारी अधिकारी टीम कुक यांनी ओपन एआय या कंपनीसोबत करार केला आहे. या करारानुसार अ‍ॅपलच्या उपकरणात अ‍ॅपल इंटेलिजन्स हे अ‍ॅप विकसित करण्यात आलं आहे. यासाठी अ‍ॅपल आणि ओपन एआय या कंपनीत हा करार झाला आहे. या कराराबाबतची माहिती टीम कुक यांनी आपल्या एक्स या सोशल हँडलवर दिली. आता "हे गोपनीय आणि प्रचंड शक्तीशाली आहे," असं ट्विट अ‍ॅपलचे मुख्य कार्यकारी अधिकारी टीम कुक यांनी केलं. मात्र ओपन एआय आणि अ‍ॅपलमध्ये झालेल्या करारावर एलन मस्क हे प्रचंड नाराज असल्याचं स्पष्ट झालं.

हेही वाचा :

  1. एलॉन मस्कला कंपनीचं 'संपूर्ण नियंत्रण' हवं होतं, ओपनआय कंपनीचा गंभीर आरोप
  2. एलॉन मस्क भारताच्या दौऱ्यावर येणार, टेस्लाचा प्रकल्प महाराष्ट्रात येणार की गुजरातमध्ये? - ELON MUSK to Visit India
  3. ब्रेन चिप न्यूरालिंकची कमाल! रुग्ण मनानं खेळतो गेम, एलन मस्क यांनी शेअर केला व्हिडिओ - Elon Musk On Neuralink Mind Control

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.