महाराष्ट्र

maharashtra

टिक-टॉक सुरू राहणार की बंद होणार ? मद्रास उच्च न्यायालयात आज सुनावणी

By

Published : Apr 24, 2019, 1:12 PM IST

टिक टॉकची मालकी असलेल्या बाईटडान्स कंपनीने १७ एप्रिलला मद्रास उच्च न्यायालयात अॅपवरील बंदीच्या निर्णयाला स्थिगिती देण्याची विनंती केली.

टिक-टॉक

नवी दिल्ली - टिक टॉकवरील बंदीबाबत महत्त्वाची सुनावणी आज मद्रास उच्च न्यायालय घेणार आहे. मद्रास उच्च न्यायालयाने टिक टॉकवरील अंतरिम बंदीबाबत २४ एप्रिलला निर्णय करण्यावर विचार करावा, असे सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी आदेश दिले होते.

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश रंजन गोगोई आणि न्यायाधीश दीपक गुप्ता आणि संजीव खन्ना यांनी टिक टॉकबाबत कोणतेही आदेश देण्यास सोमवारी नकार दिला होता.
असा आहे घटनाक्रम-
मद्रास उच्च न्यायालयाने टिक टॉक या सोशल व्हिडिओ अॅपवर आक्षेपार्ह आणि अश्लील व्हिडिओ असल्यामुळे तात्पुरती बंदी घातली होती. टिक टॉकची मालकी असलेल्या बाईटडान्स कंपनीने १७ एप्रिलला मद्रास उच्च न्यायालयात अॅपवरील बंदीच्या निर्णयाला स्थिगिती देण्याची विनंती केली. या प्रकरणात मद्रास उच्च न्यायालयाने अरविंद दातार यांची न्यायमित्र म्हणून नियुक्ती केली . सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे बाईटडान्सच्या याचिकेला २४ एप्रिलला मद्रास उच्च न्यायालयात सुनावणीसाठी ठेवण्यात आले आहे. याचिकाकर्त्याच्या अतिशयोक्तीवर आधारित मद्रास उच्च न्यायालयाचा निकाल असल्याचे टिक टॉकने सर्वोच्च न्यायालयातील याचिकेत म्हटले होते.

सोशल मीडियाची इतर माध्यमे असताना टिक टॉक कंपनीवरच कारवाई करण्यात आली आहे. असा आक्षेप घेत घटनेच्या तरतुदीचा भंग होत असल्याचे बाईट डान्स कंपनीचे वकील अभिषेक संघवी यांनी सर्वोच्च न्यायालयात म्हटले. सर्वोच्च न्यायालयाने गेल्या आठवड्यात टिक टॉकवरील बंदी उठविण्यास नकार दिला होता.

ABOUT THE AUTHOR

...view details