ETV Bharat / business

निवडणुकीच्या निकालापूर्वी शेअर बाजारात भूकंप, शेअर बाजार निर्देशांकात ५ हजार अंशाची घसरण - Share market today - SHARE MARKET TODAY

मुंबई शेअर बाजारात आज मोठी पडझड झाली. शेअर बाजारात 5 हजार अंकाहून अधिक घसरण झाली. ही आजपर्यंतची सर्वात मोठी घसरण झाली.

Share market today updates
Share market today updates (Source- ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 4, 2024, 9:56 AM IST

Updated : Jun 4, 2024, 12:26 PM IST

मुंबई- लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या एक्झिट पोलमध्ये भाजप एनडीए आघाडी पु्न्हा सत्तेवर येण्याचे वृत्त आल्यानंतर बीएसई सेंसेक्स (BSE) व एनएसई निफ्टी (NSE) निर्देशांकात ३ टक्के वाढ होत मार्केट बंद झाले होते. मात्र मंगळवारी सकाळी मतमोजणी सुरु झाल्यावर मतमोजणीचा देशभरातील कल समोर आल्यानंतर शेअर मार्केट ५ हजार अंकांपेक्षा जास्त अंकांनी कोसळला. त्यामुळे गुंतवणूकदारांच्या सुमारे १० लाख कोटी रुपयांचा चुराडा झाला.

देशभरातली विविध राज्यात सत्ताधारी भाजप व एनडीए आघाडीला काहीसा धक्का लागत असल्याचे चित्र समोर आल्यानंतर शेअर मार्केट देखील गडगडला. निफ्टी व सेंसेक्स मध्ये तब्बल ४ टक्क्यांची घट झाली आहे. एकीकडे मोदी सरकार पुन्हा सत्तेत परतेल असा विश्वास व्यक्त केला जात असताना मतमोजणीत मात्र वेगळेच चित्र समोर आले. मार्केट सातत्याने खाली घसरु लागल्याचे चित्र आहे.यं दाच्या वर्षातील ही सर्वात मोठी घसरण असल्याचे मत आर्थिक क्षेत्रातील जाणकारांनी व्यक्त केले आहे.

शेअर मार्केटची स्थिती बिघडली- विद्यमान नरेंद्र मोदी यांचे सरकार पुन्हा सत्तेत येणार की नाही? सत्ता मिळाली तरी गेल्या दोन निवडणुकांप्रमाणे बहुमत मिळणार नसले तर सरकारच्या धोरणांवर विरोधी पक्षांचा पूर्ण अंकुश राहील, या शक्यतेने बाजार कोसळत असल्याचे मत व्यक्त करण्यात आले आहे. एक्झिट पोलवर विसंबून बाजार काल वधारला होता. मात्र एक्झिट पोलचा अंदाज आणि प्रत्यक्ष परिस्थिती यामध्ये मोठा फरक पडत असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर शेअर मार्केटची स्थिती बिघडू लागली आहे.

मतमोजणीच्या अनिश्चिततेचा फटका - मतमोजणीच्या अनिश्चिततेचा फटका शेअर मार्केटला बसताना दिसत आहे. सेन्सेक्स ३७०० पेक्षा जास्त अंकांनी घसरला आहे. तर निफ्टी 22500 च्या खाली गेला आहे. मतमोजणीच्या एक दिवस शेअर मार्केटमध्ये तेजीचे वातावरण होते. विद्यमान केंद्र सरकार पुन्हा सत्तेत येण्याची शक्यता बहुतेक एक्झिट पोल मधून समोर आली होती. त्यामुळे शेअर मार्केट वधारला होता. मात्र प्रत्यक्षात मंगळवारी सकाळी मतमोजणी सुरु झाल्यावर देशभरातील बदलते कल समोर आल्याने मतमोजणीमधील अनिश्चितता समोर आली. त्याचा फटका बसून शेअर मार्केट घसरला आहे. सोमवारी सेन्सेक्स आणि निफ्टीच्या निर्देशांकांनी उच्चांक गाठला होता. तर आज घसरणदेखील मोठ्या प्रमाणात झाली. भारतीय शेअर बाजारात निवडणुकीचे निकाल जाहीर होताना मोठी पडझड सुरू झाली आहे. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक 1319 अंकांच्या घसरणीसह 75,149.45 वर पोहोचला आहे. त्याच वेळी निफ्टी 2.21 टक्क्यांच्या घसरणीसह 22,749.30 वर पोहोचला.

शेअर बाजारात काय आहे स्थिती?

  • निफ्टी 50 चे सर्व शेअर घसरले आहेत.
  • निफ्टी बँकेत 3 टक्क्यांहून अधिक घसरण झाली आहे.
  • अस्थिरता निर्देशांक भारत 17 टक्क्यांहून अधिक वाढला आहे.
  • अदानी कंपन्यांचे शेअर 11 टक्क्यांनी घसरले आहेत.
  • शेअर बाजारातील घसरणीनंतर गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 9 लाख कोटी रुपयांची घट झाली आहे. अदानी पोर्ट्स, अदानी एंटरप्रायझेस, एल अँड टी, ओएनजीसी आणि कोल इंडिया हे निफ्टीवरील सर्वात जास्त घसरलेले शेअर्स आहेत. त्यापाठोपाठ सन फार्मा, नेस्ले, सिप्ला, ब्रिटानिया आणि डिव्हिस लॅब्स या कंपनीचे शेअर घसरले आहेत.

मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात सोमवारी विक्रमी नोंद- आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारानं विक्रमी निर्देशांक नोंदविला होता. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक 2,507 अंकांच्या उसळीसह 76,468.78 वर बंद झाला. त्याच वेळी निफ्टी 3.25 टक्क्यांच्या वाढीसह 23,263.90 वर बंद झाला. अदानी पोर्ट्स, एसबीआय, एनटीपीसी, पॉवर ग्रिड या कंपन्यांचे शेअर सोमवारी वधारले होते. तर आयशर मोटर्स, एलटीआयमिंडट्री, एचसीएल टेक, सन फार्मा या कंपन्यांचे शेअर व्यवहार घसरले. पीएसयू बँका, तेल आणि वायू, ऊर्जा आणि स्थावर मालमत्ता कंपन्यांचे शेअर 5 ते 7 टक्क्यांनी वाढले होते.

हेही वाचा-

  1. लोकसभा निवडणुकीच्या निकालापूर्वीच शेअर बाजारात २ हजार अंकांची उसळी, गुंतवणुकदारांमध्ये उत्साह - share market today

Last Updated : Jun 4, 2024, 12:26 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.