महाराष्ट्र

maharashtra

अ‌ॅमेझॉनचा 'ग्रेट इंडियन फेस्टिव्हल' सेल १७ ऑक्टोबरपासून होणार सुरू

By

Published : Oct 6, 2020, 4:05 PM IST

दसरा-दिवाळी सणानिमित्त ग्राहकांना खरेदीसाठी आकर्षक सवलतीच्या योजना अ‌ॅमेझॉनने जाहीर केल्या आहेत. नेल्सनच्या सर्व्हेनुसार ८५ टक्के लघू, मध्यम विक्रेत्यांना अ‌ॅमेझॉनमधून नवीन विक्रेत्यांपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे.

ग्रेट इंडियन फेस्टिव्हल
ग्रेट इंडियन फेस्टिव्हल

नवी दिल्ली - ई-कॉमर्स कंपनी अ‌ॅमेझॉनने ग्राहकांना खरेदीत देणारी सवलत योजना जाहीर केली आहे. ही सवलत योजना ग्रेट इंडियन फेस्टिव्हल नावाने १७ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. ही खरेदी सवलत योजना कधीपर्यंत सुरू राहणार आहे, हे कंपनीने अद्याप जाहीर केले नाही.

अ‌ॅमेझॉन इंडियाचा ग्रेट इंडियन फेस्टिव्हल हा महिनाभर चालेल, अशी चर्चा आहे. त्यामुळे हा फेस्टिव्हल दसरा दिवाळीच्या सणातून साडेसहा लाख विक्रेत्यांना व्यवसायाची संधी देईल, अशी शक्यता आहे. अ‌ॅमेझॉनची स्पर्धक कंपनी फ्लिपकार्टने द बिग बिलियन डे हा १६ ऑक्टोबर ते २१ ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार आहे. अ‌ॅमेझॉन इंडियाचे उपाध्यक्ष मनीष तिवारी म्हणाले, की हा ग्रेड इंडियन फेस्टिव्हल आमच्या भागीदार व विक्रेत्यांना मोठी संधी आहे. त्यामधून ते लाखो ग्राहकापर्यंत पोहोचू शकणार आहेत. आमचे विक्रेते व्यवसाय वाढविण्यासाठी उत्सुक आहेत. नेल्सनच्या सर्व्हेनुसार ८५ टक्के लघू, मध्यम विक्रेत्यांना अ‌ॅमेझॉनमधून नवीन विक्रेत्यांपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे.

दरम्यान, सवलतीच्या खरेदी योजनेत ब्रँडेड कंपन्यांकडून ९०० विविध उत्पादने लाँच करणार आहेत. कंपनीने ग्राहकांना कर्जसुविधा देण्यासाठी एचडीएफसी बँकेबरोबर भागीदारी केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details