महाराष्ट्र

maharashtra

...म्हणून अ‌ॅ‌‌‌‌मेझॉनने फ्युचर ग्रुपला पाठविली कायदेशीर नोटीस

By

Published : Oct 8, 2020, 7:55 PM IST

रिलायन्स फ्युचर ग्रुप विकत घेतल्यानंतर जागतिक कंपन्यांनी रिलायन्स रिटेलमध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात केली आहे. अशातच हा सौदा कायदेशीर प्रक्रियेत अडकण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

अ‌ॅ‌‌‌‌मेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस
अ‌ॅ‌‌‌‌मेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस

नवी दिल्ली- अमेरिकेची ई-कॉमर्स कंपनी अमेझॉनने रिलायन्सशी सौदा करणाऱ्या फ्युचर ग्रुपला कायदेशीर नोटीस पाठविली आहे. फ्युचर ग्रुपने रिलायन्सशी २४ हजार ७१३ कोटींचा सौदा करताना अ‌ॅ‌‌‌‌मेझॉनबरोबर झालेल्या कराराचे उल्लंघन केल्याचे कंपनीने म्हटले आहे.

अ‌ॅ‌‌‌‌मेझॉनच्या प्रवक्त्याने म्हटले, की कराराच्या अधिकाराची अंमलबजावणी करण्यासाठी आम्ही पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. प्रकरण न्यायालयीन असल्याने जास्त माहिती देणे शक्य नाही.

हा आहे अ‌ॅ‌‌‌‌मेझॉनचा आक्षेप-

अ‌ॅ‌‌‌‌मेझॉनने फ्युचर ग्रुपची कंपनी फ्युचर कुपनमध्ये ४९ टक्के हिस्सा घेतला होता. त्यानुसार फ्युचर रिटेलचा हिस्सा घेताना ३ ते १० वर्षांपर्यंत अ‌ॅ‌‌‌‌मेझॉनला प्राधान्य मिळावे, अशी करारात अट होती. फ्युचर कुपनचा फ्युचर रिटेलमध्ये ७.३ टक्के हिस्सा आहे. मात्र, फ्युचर ग्रुपने करार करत रिटेलचा घाऊक, किरकोळ व लॉजिस्टिक्सचा व्यवसाय रिलायन्सला दिला आहे.

अद्याप, रिलायन्स आणि फ्युचर ग्रुपच्या व्यवहाराला नियामक संस्थेकडून परवानगी मिळालेली नाही. सूत्राच्या माहितीनुसार फ्युचर कुपनला अ‌ॅ‌‌‌‌मेझॉनची कायदेशीर नोटीस मिळाली आहे. रिलायन्स फ्युचर ग्रुप विकत घेतल्यानंतर जागतिक कंपन्यांनी रिलायन्स रिटेलमध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात केली आहे. रिलायन्स रिटेलमध्ये सिल्वर लेक, केकेआर, जनरल अटलांटिक, मुबादला, जीआयसी, टीपीजी आणि एडीआयए कंपन्यांनी ३७ हजार ७०० कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक केली आहे.

दरम्यान, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि फ्युचर ग्रुपकडून प्रतिक्रिया मिळू शकली नाही.

ABOUT THE AUTHOR

...view details