महाराष्ट्र

maharashtra

२०२२ पर्यंत आयटी कंपन्यांमध्ये ३० लाख नोकऱ्यांची होणार कपात-अहवाल

By

Published : Jun 16, 2021, 10:55 PM IST

कमी कौशल्य असलेल्या ९० लाख मनुष्यबळामध्ये ३० टक्के किंवा ३० लाख मनुष्यबळात २०२० पर्यंत कपात होईल, असे नॅसकॉमने म्हटले आहे. हा परिणाम रोबोट प्रोसेस ऑटोमेशन अथवा आरपीएने होणार आहे. सुमारे ०.७ दशलक्ष मनुष्यबळाची जागा ही आरपीए घेणार आहे.

IT JOB
आयटी नोकऱ्या

नवी दिल्ली -ऑटोमेशन प्रक्रियेमुळे विविध उद्योगांमध्ये विशेषत: तंत्रज्ञान आणि सॉफ्टवेअर उद्योगांमध्ये मोठी मनुष्यबळ कपात होणार आहे. या उद्योगांमध्ये १.६ कोटी मनुष्यबळ कार्यरत आहे. यामध्ये २०२२ पर्यंत ३० लाखांची कपात होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे कंपन्यांची वर्षाला १०० अब्ज डॉलरची बचत होणार आहे.

देशातील आयटी उद्योगांमध्ये १.६ कोटी मनुष्यबळ कार्यरत आहे. त्यापैकी ९० लाख मनुष्यबळ हे कमी कौशल्य असलेल्या सेवा आणि बीपीओमध्ये असल्याचे नॅसकॉमने म्हटले आहे.

कमी कौशल्य असलेल्या ९० लाख मनुष्यबळामध्ये ३० टक्के किंवा ३० लाख मनुष्यबळात २०२० पर्यंत कपात होईल, असे नॅसकॉमने म्हटले आहे. हा परिणाम रोबोट प्रोसेस ऑटोमेशन अथवा आरपीएने होणार आहे. सुमारे ०.७ दशलक्ष मनुष्यबळाची जागा ही आरपीए घेणार आहे. कारण, उद्योगांमध्ये तंत्रज्ञानातील अद्ययावतीकरण व कौशल्यातील बदलाने होणार आहे. आरपीएचा सर्वात वाईट परिणाम हा अमेरिकेत परिणाम होणार आहे.

हेही वाचा-नादारी प्रक्रियेतील डीएसके डेव्हलपरच्या खरेदीकरता दोन कंपन्यांकडून निविदा दाखल

आरपीएमुळे कंपन्यांच्या वार्षिक खर्चात होणार कपात-

भारतामध्ये कर्मचाऱ्याला वार्षिक २५ हजार डॉलरचा खर्च आहे. तर अमेरिकेतील कर्मचाऱ्याचा वार्षिक ५० हजार डॉलर खर्च आहे. आरपीएच्या वापरामुळे कंपन्यांच्या वार्षिक वेतन आणि इतर कॉर्पोरेट खर्चात कपात होणार आहे.

हेही वाचा-COVAXIN च्या निर्मितीत गोवंशाच्या सीरमचा वापर नाही- आरोग्य मंत्रालयाचे स्पष्टीकरण

या कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांची कपात होण्याची शक्यता-

टीसीएस, इन्फोसिस, विप्रो, एचसीएल, टेक महिंद्रा आणि कॉग्नीझंट आणि इतर कंपन्यांकडून कमी कौशल्य असलेल्या नोकऱ्यांमध्ये २०२२ पर्यंत ३० लाख नोकऱ्यांची कपात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे १०० अब्ज डॉलरची वेतन आणि इतर खर्चात कपात होणार आहे. दुसरीकडे आयटी उद्योगांमध्ये नवीन सॉफ्टेवअर उद्योगांसाठी ५ अब्ज डॉलरची २०२२ पर्यंत संधी मिळणार आहे.

आरपीए म्हणजे काय?

रोबोट्स हे २४ तास काम करू शकतात. तर एक रोबो हे १० जणांचे काम करू शकतो, असे अहवालात म्हटले आहे. रोबोटो प्रोसेस ऑटोमेशन (आरपीए) हे अॅप्लीकेशन सॉफ्टवेअर आहे. त्यामध्ये भौतिक रोबोट्स नसतात.

ABOUT THE AUTHOR

...view details