महाराष्ट्र

maharashtra

...म्हणून पुण्याच्या विमानतळावरून विमान उड्डाणे वर्षभराकरता रात्रीच्यावेळी असणार बंद

By

Published : Oct 7, 2020, 4:01 PM IST

पुणे विमानतळावर धावपट्टीचे काम २६ ऑक्टोबरपासून सुरू करण्यात येत आहे. या निर्णयामुळे १० टक्के विमान उड्डाणाच्या वेळेत बदल करण्यात आला आहे.

संग्रहित
संग्रहित

पुणे - पुणे विमानतळावरून यापुढे रात्रीच्या वेळी धावपट्टीवर विमान उतरणे व उड्डाणे होणार नाहीत. येथील धावपट्टीचे काम सुरू होणार असल्याने विमानतळ यंत्रणेने हा निर्णय घेतला आहे. ही धावपट्टी एक वर्षासाठी रात्रीच्या वेळी विमानांसाठी बंद असणार आहे.

पुणे विमानतळावर धावपट्टीचे काम २६ ऑक्टोबरपासून सुरू करण्यात येत आहे. हे काम सुमारे वर्षभर चालेल, असे पुणे विमानतळाचे संचालक कुलदीप सिंह यांनी सांगितले. पुढे ते म्हणाले, की धावपट्टीचे काम रात्री होणार आहे. त्यामुळे विमानतळावरील उड्डाणे आणि विमान उतरण्याचे कामकाज रात्री ८ ते सकाळी ८ वाजेपर्यंत बंद राहणार आहे. केवळ दिवसा विमान उड्डाणे आणि विमान धावपट्टीवर होण्याचे काम सुरू राहणार असल्याचेही कुलदीप सिंह यांनी सांगितले. या निर्णयामुळे १० टक्के विमान उड्डाणाच्या वेळेत बदल करण्यात आला आहे.

पुण्याचे आमदार गिरीश बापट यांच्या अध्यक्षतेखाली विमानतळाच्या सल्लागार समितीची मंगळवारी बैठक झाली. यामध्ये प्रवाशांना सुविधा देणे, विमानतळाच्या पायभूत सुविधा व रस्त्यांचे रुंदीकरण आदी विषयांवर चर्चा करण्यात आली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details