महाराष्ट्र

maharashtra

क्रिप्टोचलनात व्यवहार केल्यास १० वर्षाचा तुरुंगवास ; कायद्याच्या कच्च्या मसुद्यात प्रस्ताव

By

Published : Jun 8, 2019, 1:05 PM IST

क्रिप्टोचलनाचा मनी लाँड्रिगमध्ये अधिक वापर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्राप्तीकर विभाग आणि केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि उत्पादन शुल्क मंडळाने (सीबीआयसी) क्रिप्टोचलनावरील बंदीचे समर्थन केले आहे.

प्रतिकात्मक - क्रिप्टोचलन

नवी दिल्ली - ऑनलाईन खरेदी विक्रीसाठी क्रिप्टोचलनाचा वापर केला जात आहे. मात्र, असा वापर करणे कायद्याने गुन्हा ठरणार आहे. क्रिप्टोचलन घेणे, विकणे अथवा त्याचा आर्थिक व्यवहार केल्यास १० वर्षाचा तुरुंगवास होवू शकतो. त्याबाबतचा प्रस्ताव कायद्याच्या कच्च्या मसुद्यात करण्यात आला आहे.


'क्रिप्टोचलन बंदी आणि नियमनाचे कार्यालयीन डिजिटल चलन बिल २०१९' हा कायद्याचा मसुदा सरकारने तयार केला आहे. यामध्ये क्रिप्टो चलनाची निर्मिती खरेदी-विक्री, हस्तांतरण अशा सर्व व्यवहारांवर बंदी येणार आहे. या नियमाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीला १० वर्षाच्या तुरुंगवासाची तरतूद करण्याचा प्रस्ताव मसुद्यात आहे. या कच्च्या मसुद्यावर अर्थव्यवहार सचिव सुभाष चंद्र गर्ग यांच्या नेतृत्वाखाली वरिष्ठ अधिकाऱ्यांनी काही काळ काम केले आहे.
कायदा लागू झाल्यास क्रिप्टोचलन हे देशात पूर्णपणे बेकायदेशीर ठरणार आहे. ते चलन घेणे हा अजामिनपात्र गुन्हादेखील होणार आहे.

यामुळे घालण्यात येणार बंदी
क्रिप्टोचलनाचा मनी लाँड्रिगमध्ये अधिक वापर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्राप्तीकर विभाग आणि केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि उत्पादन शुल्क मंडळाने (सीबीआयसी) क्रिप्टोचलनावरील बंदीचे समर्थन केले आहे.

क्रिप्टोचलनावर बंदीसाठी देशात कठोर कायदा अस्तित्वात येणार आहे. त्याला पर्याय म्हणून देशासाठी सरकारकडून स्वतंत्र डिजिटल चलन आणले जाण्याची शक्यता आहे. आरबीआयशी चर्चा करून करण्यात डिजिटल चलन सुरू करण्याचा निर्णय घेण्यात येवू शकतो, असे सूत्राने स्पष्ट केले.


काय आहे क्रिप्टोचलन-
क्रिप्टोचलन हे आभासी अथवा डिजीटल चलन आहे. त्यासाठी क्रिप्टोग्राफीचा वापर करून ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. सध्या बिटकॉईन हे क्रिप्टोचलनात सर्वात अधिक लोकप्रिय आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details