महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

H3N2 Death : गुजरातमध्ये H3N2 चा पहिला बळी, देशभरात रुग्णांच्या संख्येत वाढ

गुजरातमध्ये H3N2 विषाणूमुळे पहिला मृत्यू झाला आहे. वडोदरा येथील सयाजी रुग्णालयात उपचारादरम्यान एका ५८ वर्षीय महिलेचा संशयास्पद मृत्यू झाला. H3N2 विषाणूमुळे देशातील हा तिसरा मृत्यू आहे.

H3N2
H3N2

By

Published : Mar 14, 2023, 12:08 PM IST

वडोदरा (गुजरात) :जगभरात हाहाकार माजवणाऱ्या कोरोना विषाणूने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. त्याचबरोबर आता H3N2 व्हायरसनेही देशात भीतीचे वातावरण पसरवले आहे. वडोदरा शहरात एका H3N2 पॉझिटिव्ह रुग्णाचा संशयास्पद विषाणूमुळे मृत्यू झाल्याची नोंद आहे. तथापि, अद्याप या संदर्भात अधिकृत मृत्यूची घोषणा करण्यात आलेली नाही.

महिलेचा उपचारादरम्यान संशयास्पद मृत्यू : मिळालेल्या माहितीनुसार, वडोदरा येथील एका ५८ वर्षीय महिलेला दोन दिवसांपूर्वी उपचारासाठी सयाजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दोन दिवसांच्या उपचारानंतर महिलेचा उपचारादरम्यान संशयास्पद मृत्यू झाला. ही महिला उच्च रक्तदाबाची रुग्ण असून ती व्हेंटिलेटरवर होती असे डॉक्टरांनी सांगितले. या महिलेला दोन दिवसांपूर्वीच उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.

नमुने पुण्याला पाठवले : या महिलेमध्ये H3N2 विषाणूची लक्षणे दिसून आली आहेत. तिला सयाजी रुग्णालयात दाखल करून तेथे तिच्यावर उपचार सुरू होते. मात्र, आता उपचारादरम्यान तिचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. H3N2 विषाणूच्या तपासणीसाठी नमुने पुण्याला पाठवण्यात आले आहेत. सध्या वडोदरा शहरात या विषाणूमुळे झालेला हा पहिला मृत्यू आहे. यापूर्वी देशात या विषाणूमुळे दोन मृत्यूची नोंद झाली आहे. मात्र गुजरात राज्यातील हा पहिला मृत्यू आहे. सध्या वडोदराच्या SOG हॉस्पिटलमध्ये गेल्या 24 तासांत H3N2 च्या दोन संशयित प्रकरणांपैकी एकाची नोंद झाली आहे. एकूण 36 व्यक्तींचे नमुने घेण्यात आले. त्यापैकी 2 व्यक्ती RTPCR मध्ये पॉझिटिव्ह आढळल्या आहेत. तसेच एक रुग्ण जलद चाचणीत दाखल असून एक रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहे.

बंगालमध्ये एडिनोव्हायरसचा धोका वाढला : पश्चिम बंगालमध्ये गेल्या काही दिवसांपासून एडिनोव्हायरसचा प्रसार मोठ्या प्रमाणात होतो आहे. आयसीएमआरने केलेल्या एका सर्वेक्षणात देशभरात जानेवारी ते मार्च या कालावधीत 38 टक्के स्वॅब नमुने एडिनोव्हायरस पॉझिटिव्ह आढळले आहेत. या विषाणूचा सर्वाधिक धोका दोन वर्षाखालील मुलांना आहे. या व्हायरसवर सध्यातरी उपचार करण्यासाठी कोणतेही अधिकृत औषध किंवा कोणतेही विशिष्ट उपचार उपलब्ध नाहीत.

हेही वाचा :Adenovirus Alert : देशभरात वाढतो आहे एडेनोव्हायरसचा धोका, या राज्यात रुग्णांची संख्या सर्वाधिक

ABOUT THE AUTHOR

...view details