महाराष्ट्र

maharashtra

PM Rishi Sunak : ब्रिटनला मिळाला आतापर्यंतचा सर्वात तरुण पंतप्रधान; जाणून घ्या, ऋषी सुनक कोण आहेत?

By

Published : Oct 24, 2022, 10:08 PM IST

ब्रिटनचे पंतप्रधान लिझ ट्रस यांच्या राजीनाम्यानंतर ( Britain Political Crisis ) आता भारतीय वंशाचे ऋषी सुनक ( Rishi Sunak ) यांची ब्रिटनच्या पंतप्रधानपदी निवड करण्यात आली ( Selection of Rishi Sunak as Prime Minister of Britain ) आहे. त्यांच्याबद्दल आम्ही ( Rishi Sunak Britain Youngest Prime Minister ) तुम्हाला काही विशेष गोष्टी सांगणार आहेत.

Rishi Sunak
ऋषि सुनक

हैदराबाद : सत्ताधारी पुराणमतवादी पक्षाने युनायटेड किंगडमचे पंतप्रधान म्हणून ऋषी सुनक ( Rishi Sunak ) यांच्या नावाची घोषणा केली, तेव्हा 42 वर्षीय भारतीय वंशाच्या ( Rishi Sunak Britain Youngest Prime Minister ) ब्रिटिश राजकारण्यासाठी ही दिवाळीची सर्वात मोठी भेटच होती. एक जुनी म्हण आहे. जेमतेम नऊ आठवड्यांपूर्वी सनक यांचा 20 हजार मतांच्या फरकाने पराभव झाला होता. माजी पंतप्रधान लिझ ट्रस यांनी सुनक यांना धूळ चारत विजय संपादन केला होता. कंझर्व्हेटिव्ह पक्षाच्या 357 खासदारांपैकी निम्म्याहून अधिक खासदारांनी त्यांना पाठिंबा दिला. पक्षाचा नेता होण्यासाठी त्यांना किमान 100 खासदारांचा पाठिंबा हवा होता. बकिंगहॅम पॅलेसमध्ये राजा चार्ल्स तिसरा यांच्याशी भेट घेतल्यानंतर सुनक पंतप्रधान म्हणून लंडनच्या पंतप्रधान कार्यालय, 10 डाउनिंग स्ट्रीटमध्ये पाऊल ठेवतील. सुनक हे ब्रिटनचे पहिले कृष्णवर्णीय पंतप्रधान आहेत. पंतप्रधानांचे निवासस्थान असलेल्या 10 डाऊनिंग स्ट्रीटचे पहिले हिंदू रहिवासी होण्याचा मान सुनक यांना मिळाला आहे.

लिझ ट्रस यांच्याकडून पराभव - सत्ताधारी पक्षाकडून खासदारांचा पाठिंबा नाकारण्यात आल्यानंतर गेल्या महिन्यात विद्यमान पंतप्रधान लिझ ट्रस यांच्याकडून निवडणुकीत पराभव पत्करावा लागला होता. सुनक यांच्या विजयामुळे त्यांच्या राजकीय क्षेत्रात लक्षणीय बदल घडून येणार आहेत. कंझर्व्हेटिव्ह पक्षात ट्रस यांच्या नेतृत्वाविरुद्ध उघड बंडखोरी झाली होती. ट्रस केवळ 45 दिवस पंतप्रधान राहिल्यानंतर त्यांनी पदाचा राजीनामा दिला होता. सुनकचा जन्म ब्रिटनमध्ये झाला आहे. त्यांचे वडील भारतीय वंशाचे यशवीर हे निवृत्त डॉक्टर आहेत. तर आई उषा सुनक या फार्मासिस्ट आहेत. आपली उमेदवारी जाहीर करताना, सुनक म्हणाले होते की, "आपल्याला देशाची अर्थव्यवस्था सुधारायची आहे, त्यांच्या पक्षाला एकत्र करायचे आहे. देशासाठी काम करायचे आहे." मी तुमच्याकडून संधी मागत आहे कृपया मला संधी द्या अशी विनंती त्यांनी केली होती.

ऋषि सुनक यांचे कुंटुब

सुनक यांचे प्रारंभिक जीवन -ऋषी सुनक यांच्याबद्दल सांगायचे तर त्यांचा जन्म १२ मे १९८० रोजी इंग्लंडमध्ये झाला. त्यांचे कुटुंब हे पंजाबी हिंदू पंडित कुटुंब आहे.त्यांचे वडील यशवीर हे निवृत्त डॉक्टर आहेत. ऋषी सनक यांच्या वडिलांचे नाव यशवीर आणि आईचे नाव उषा देवी आहे. याशिवाय त्यांची आई व्यवसायाने फार्मासिस्ट आहे. ऋषी सुनक हे त्यांच्या कुटुंबातील तीन भावंडांपैकी सर्वात मोठे आहेत. त्यांच्या बहिणीचे नाव राखी, भावाचे नाव संजय आहे. सुनक यांचे आजी- आजोबा पंजाब राज्यातील रहिवाशी होते. सुनक यांच्या पत्नीचे नाव अक्षता मूर्ती असून त्या भारतीय उद्योगपती नारायन मुर्ती यांच्या कन्या आहेत. तसेच सुनक यांना अनुष्का आणि कृष्णा या दोन मुली आहेत.

ऋषि सुनक यांची बायको अक्षता

ऋषी सुनक यांचे शिक्षण -ऋषी सुनक यांचे प्राथमिक शिक्षण विंचेस्टर कॉलेजमध्ये झाले. त्यांनतर त्यांनी ऑक्सफर्डच्या लिंकन कॉलेजमध्ये तत्त्वज्ञान, राजकारण अर्थशास्त्र (पीपीई)चा अभ्यास केला. कॅलिफोर्नियातील स्टॅनफोर्ड विद्यापीठातून फुलब्राइट स्कॉलर म्हणून एमबीए पुर्ण केले आहे. सुनक यांना शिक्षण मिळविण्यासाठी संघर्ष करावा लागला होता. त्याचे आजी-आजोबा पंजाबचे होते, पण सुरुवातीला ते पूर्व आफ्रिकेत आणि नंतर ब्रिटनमध्ये गेले.

ऋषी सुनकीची राजकीय सुरुवात - सुनक यांचा राजकीय प्रवास 2014 साली सुरू झाला. त्याच वर्षी त्यांनी पहिल्यांदा ब्रिटिश संसदेत खासदार म्हणून प्रवेश केला. 2015 मध्ये, ऋषी यांनी रिचमंडमधून सार्वत्रिक निवडणूक लढवली होती. त्यांचा प्रचंड बहूमतांनी विजय मिळाला होता. 2015 पासून, 2017 दरम्यान ते यूकेचे खासदार होते. 2017 मध्ये तत्कालीन ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी त्यांची मुख्य सचिव म्हणून नियुक्ती केली. 2019 मध्ये, त्यांनी पुन्हा एकदा निवडणुकीत मोठा विजय नोंदवला होता. सलग तिसऱ्यांदा यूकेचे खासदार बनले होते. त्यानंतर त्यांच्याकडे अर्थमंत्रीपद सोपवण्यात आले होते.

ऋषी सुनक ब्रिटनचे अर्थमंत्री -कोरोना महामारीच्या काळात ब्रिटनमधील लोकांना मदत करण्यासाठी त्यांनी मोठी घोषणाही केली होती. 11 मार्च 2020 रोजी त्यांनी आपला पहिला अर्थसंकल्प सादर केला होता. कोरोना महामारीत ब्रिटनच्या अर्थमंत्री पदाची धूरा सुनक यांनी चांगली सांभाळली होती. सुनक यांनी 2021 मध्ये तिसरा अर्थसंकल्प सादर केला होता. या अर्थसंकल्पात आरोग्य संशोधनावर अधिक भर देण्यात आला होता. सुनक हे बोरिस सरकारमधील अतिशय लोकप्रिय मंत्री होते. त्यांच्या लोकप्रियतेचा अंदाज यावरून लावता येतो की, सरकार जेव्हा कधी पत्रकार परिषदा घेत असे, तेव्हा ते अनेकदा सुनक दिसायचे. कोरोनाच्या काळात ब्रिटनची आर्थिक स्थिती चांगली ठेवल्याबद्दल ऋषी सुनक यांचेही कौतुक होत आहे. कोरोनाच्या काळातही सर्व वर्गातील लोक त्यांच्या कामावर पूर्णपणे खूश होते. कोरोनाच्या काळातच, ऋषी सुनक यांच्या धोरणांमुळे कोणतेही नुकसान नागरिकांना झाले नाही. त्यामुळे सुनक यांची लोकप्रियता आणखीच वाढली.

ऋषी सुनक यांची संपत्ती -ऋषी सुनक हे इंग्लंडमधील सर्वात श्रीमंत लोकांपैकी एक मानले जातात. ऋषी यांनी राजकारण, व्यवसायातून भरपूर पैसा कमावला आहे. त्याची सध्याची एकूण संपत्ती 3.1 अब्ज पौंडांच्या जवळपास आहे. ऋषी सुनक हे ब्रिटनचे असे नेते आहेत, ज्यांना श्रीमंत सासरमुळेही लक्ष्य केले जाते. वास्तविक ऋषी सुनकचे लग्न इन्फोसिसचे सह-संस्थापक नारायण मूर्ती यांची मुलगी अक्षतासोबत झाले आहे. स्टॅनफोर्ड येथे एमबीए अभ्यासक्रमादरम्यान दोघांची भेट झाली. पुढे दोघांनी लग्न केले. ऋषी आणि अक्षता यांना दोन मुलीही आहेत, ज्यांची नावे कृष्णा अनुष्का आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details