महाराष्ट्र

maharashtra

मुलायमसिंह यादव कोरोनातून बरे; लवकरच राजकारणात सक्रीय होणार

By

Published : Oct 26, 2020, 8:54 AM IST

राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे जेष्ठ नेते मुलायमसिंह यादव कोरोनातून बरे झाल्यानंतर घरी परतले आहेत. समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी ट्विटद्वारे ही माहिती दिली.

Mulayam Singh Yadav
मुलायमसिंह यादव

लखनऊ- राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे नेते मुलायमसिंह यादव हे कोरोनामधून बरे झालेत. मेदांता रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मुलायमसिंह यादव आता पूर्णपणे बरे झाले असुन ते घरी विश्रांती घेणार असल्याचे समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी सांगितले.

मुलायमसिंग यादव यांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. काही दिवसांपूर्वी रुग्णालयातून त्यांचा एक फोटो समोर आला होता. त्यानंतर त्यांच्या हितचिंतकांनी त्यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना केली होती.

विरोधी उमेदवारांच्या अडचणीत वाढ

मुलायमसिंह यादव कोरोनासारख्या रोगाला पराभूत करून घरी परतले आहेत. दोन आठवड्यांहून अधिक काळ मेदांता रुग्णालयात घालवल्यानंतर ते घरी परतले आहेत. मुलायमसिंह यादव परत आल्यानंतर सपा समर्थकांमध्ये जल्लोषाचे वातावरण आहे. उत्तर प्रदेशात सात विधानसभा जागांवर पोटनिवडणूक घेण्यात येत असून यामध्ये सपाचे मुलायमसिंह यादव यांना अखिलेश यादव यांनी पक्षाचे स्टार प्रचारक बनवले आहे.

हेही वाचा-बिहार निवडणुकीच्या पहिला टप्प्यातील प्रचाराच्या तोफा आज थंडावणार; २८ तारखेला मतदान

स्टार प्रचारकांची यादी जाहीर झाली, तेव्हा लोकांमध्ये चर्चेचा विषय होता की मुलायमसिंह यादव कोरोनाशी लढत असतांना प्रचार कसा करतील. परंतू ते कुस्तीपटूप्रमाणे कोरोना विषाणूचा पराभव करत राजकीय मैदानात परतले आहेत. काही दिवस विश्रांती घेतल्यानंतर, ते स्टार प्रचारक म्हणून उमेदवारांच्या बाजूने उभे असतील. उमेदवारांच्या बाजूने प्रचार करून ते विरोधी उमेदवारांना अडचणीत आणू शकतात, अशी आशा बाळगली जात आहे.

हेही वाचा-देशातील कोरोनासंबंधी महत्त्वाच्या घडामोडी...वाचा एका क्लिकवर

पत्नीचा रिपोर्टही आला होता पॉझिटिव्ह

मुलायमसिंह यादव यांच्यासमवेत त्यांची पत्नी साधना गुप्ता यांचा रिपोर्टही पॉझिटिव्ह आला, परंतु त्यांना कोरोनाची लक्षणे कमी होती. अशा परिस्थितीत त्यांच्यावर घरी उपचार सुरू होते. आणि मुलायमसिंह यादव यांना मेदांता रुग्णालयात दाखल केले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details