महाराष्ट्र

maharashtra

मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांचा आमदारांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद

By

Published : Apr 3, 2020, 4:36 PM IST

दिल्लीतील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि लॉकडाऊन यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकांच्या समस्यांचे निराकारण कसे करावे, याबाबत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आपल्या आमदारांसोबत चर्चा केली.

Chief Minister Arvind Kejriwal interacts with MLAs through video conferencing
मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांचा आमदारांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद

नवी दिल्ली - दिल्लीतील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि लॉकडाऊनमुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकांच्या समस्यांचे निराकारण कसे करावे, याबाबत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आपल्या आमदारांसोबत चर्चा केली. अरविंद केजरीवाल यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आमदारांसोबत संवाद साधला. यावेळी त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आणि आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन उपस्थित होते.

मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांचा आमदारांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद

हेही वाचा...देशाला इव्हेंटची नाही तर...बाळासाहेब थोरातांचा पंतप्रधान मोदींवर निशाणा

दिल्लीत कोरोनाबाधितांचे आकडे सतत वाढत आहेत. त्याचबरोबर हातावर पोट असणाऱ्या लोकांवरही लॉकडाउनचा परिणाम होत आहे. जनतेला मदत केली जात असल्याचा दावा सरकारकडून केला जात आहे. मात्र, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या विविध समस्यांवर केजरीवाल यांनी शुक्रवारी सर्व आमदारांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. या बैठकीत त्यांनी आमदारांना काही सूचना दिल्या, तसेच त्यांच्याकडूनही काही सूचना स्वीकारल्या.

ABOUT THE AUTHOR

...view details