ETV Bharat / state

लोहा कंधार मतदारसंघासाठी शेकापच्या आशाताई शिंदेंनी घेतली शरद पवारांची भेट - Loha Kandhar Constituency

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 3, 2024, 10:53 PM IST

Ashatai Shinde meets Sharad Pawar: शेतकरी कामगार पक्षाच्या महाराष्ट्र महिला प्रदेशाध्यक्षा आशाताई शिंदे यांनी आज खासदार शरद पवार यांची मुंबईत भेट घेतली. माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर लोहा विधानसभा मतदारसंघात तयारीला लागले असतानाच भगिनी आशाताईंनीही आता तयारी सुरू केल्याची चर्चा आहे.

Ashatai Shinde meets Sharad Pawar
आशाताई शिंदे शरद पवार (ETV BHARAT Reporter)

नांदेड Ashatai Shinde meets Sharad Pawar : शेतकरी कामगार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा आशाताई शिंदे यांचे बंधू प्रताप पाटील चिखलीकर सध्या प्रचंड अडचणीत आहेत. विजयाची खात्री असताना नांदेड लोकसभा मतदारसंघातून त्यांना हार पत्करावी लागली. आता लोहा-कंधार विधानसभा मतदारसंघातून स्वत:च्या पुनर्वसनासाठी प्रयत्नशील असलेल्या चिखलीकर यांच्या भगिनी आशाताई शिंदे यांनी घेतलेल्या नव्या राजकीय भूमिकेमुळं चर्चेला उधाण येत आहे.

आशाताई शिंदें शरद पवारांच्या भेटीला : आशाताई शिंदे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) अध्यक्ष शरद पवार यांची त्यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानी भेट घेतली. या राजकीय बैठकीनंतर आशाताई शिंदे राष्ट्रवादीची धुरा सांभाळणार का? याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे. विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस पक्षाकडून आशाताई शिंदे यांना पक्षप्रवेशाची ऑफर देण्यात आली होती.

राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची चर्चा : मुंबईतील टिळक भवन येथील काँग्रेस प्रदेश कार्यालयातही त्यांच्या प्रवेशाची जय्यत तयारी करण्यात आली होती. पण कौटुंबिक कारण सांगून आशाताईंनी काँग्रेसमध्ये येण्यास नकार दिला. मात्र, लोकसभा निवडणुकीनंतर आशाताई शिंदे यांनी शरद पवार यांची भेट घेतल्यानं त्या शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू आहे.

लोहा-कंधार मतदारसंघाच्या प्रश्नावर चर्चा : शरद पवार यांच्याशी विविध विषयांवर चर्चा झाल्याचं शिंदे यांनी सांगितलं. लोहा-कंधार मतदारसंघाच्या प्रश्नावर पवार यांच्याशी चर्चा झाल्याचंही त्यांनी सांगितलं. तासभर चाललेल्या बैठकीत राजकीय मुद्द्यांवरही चर्चा झाल्याचं सांगण्यात येत आहे. लोहा-कंधार विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार शामसुंदर शिंदे यांच्या पत्नी आशाताई शिंदे या विधानसभा लढविण्यास इच्छुक आहेत.

नवी राजकीय खेळी : एकीकडं आशाताई शिंदे यांनी शरद पवार यांची भेट घेऊन नवी राजकीय खेळी केली आहे. तिकडं त्यांच्या भावानं लोकसभेतील पराभवानंतर लोहा-कंधारमधून पुन्हा मैदानात उतरण्याची घोषणा केली आहे. त्यामुळं लोहा-कंधारमध्ये बहीण विरुद्ध भावाची लढत पाहायला मिळेल का? याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे. प्रताप पाटील चिखलीकर आणि त्यांची बहीण आशाताई शिंदे यांच्यातील वैर जिल्ह्याच्या राजकारणात प्रसिद्ध आहे. आता लोहा-कंधार मतदारसंघात हे भाऊ-बहीण एकमेकांच्या विरोधात येणार का? पक्षप्रवेशासाठी आशा शिंदे यांची शरद पवारांची भेट होणार का? यावर लोहा-कंधार मतदारसंघाचे भविष्यातील राजकारण अवलंबून राहणार आहे.

'हे' वाचलंत का :

  1. "उद्धव ठाकरेंना हिरव्या झेंड्याच्या तालावर नाचताना पाहून...", देवेंद्र फडणवीस यांची घणाघाती टीका - Fadnavis on Uddhav Thackeray
  2. गुजरातचा विकास करण्याच्या नादात फडणवीसांनी महाराष्ट्राचं वाटोळं केलं - रोहित पवार - Rohit Pawar On Devendra Fadnavis
  3. डोकं बिघडलेल्यांना फार उत्तर द्यायचं नसतं; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला - Devendra Fadnavis

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.