मुंबईत पदवीधर मतदानासाठी नवमतदारांचा उत्साह; मतदानासाठी सकाळपासूनच रांगा - Vidhan Parishad Election 2024

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 26, 2024, 10:10 AM IST

thumbnail
मतदान करण्यासाठी नवमतदारांमध्ये उत्साह (Source - ETV Bharat Reporter)

मुंबई Mumbai Graduate Election : महाराष्ट्रात विधान परिषदेच्या चार जागांसाठी आज मतदान होत आहे. त्याचबरोबर मुंबईमध्ये मुंबई पदवीधर मतदार संघासाठी मतदान होत आहे. मुंबईतील वरळी येथील मुंबई पब्लिक स्कूल या मतदार केंद्रावर मुंबई पदवीधर मतदार संघाचे भाजपचे उमेदवार किरण शेलार यांनी मतदान केलं. यंदा शिक्षक व पदवीधर मतदार संघासाठी पहिल्यांदा मतदान करणाऱ्या मतदारांचा टक्काही मोठ्या प्रमाणात आहे. मुंबई पदवीधर मतदार संघात भाजपचे उमेदवार किरण शेलार आणि उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार अनिल परब यांच्यात लढत होत आहे. या मतदारसंघात एकूण 1 लाख 20 हजार 673 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे. या निवडणुकीत दोन्ही पक्षांनी उमेदवारांना जिंकून आणण्यासाठी सर्व शक्तीपणाला लावली आहे. 

ABOUT THE AUTHOR

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.