सावरकर वक्तव्य प्रकरणी राहुल गांधी यांना पुण्याच्या न्यायालयात हजर राहण्यासाठी समन्स - Rahul Gandhi

By ETV Bharat Marathi Team

Published : May 31, 2024, 7:51 PM IST

thumbnail
माध्यमांशी संवाद साधताना वकील संग्राम कोल्हटकर (ETV Bharat Reporter)

पुणे Rahul Gandhi : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मागच्या वर्षी 5 मार्च 2023 रोजी लंडनमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विरोधात जे वादग्रस्त वक्तव्य केलं होतं, त्या प्रकरणी पुणे जिल्हा सत्र न्यायालयाचे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी अक्षी जैन यांनी राहुल गांधी यांना 19 ऑगस्ट रोजी न्यायालयात हजर राहण्याचं समन्स दिलय. स्वातंत्रवीर सावरकरांचे नातू सात्यकी सावरकर यांनी एप्रिल 2023 मध्ये याबाबत न्यायालयात तक्रार दाखल केली होती. त्या प्रकरणाची गुरुवारी (30 मे) सुनावणी करण्यात आली. याबाबत सांगताना वकील संग्राम कोल्हटकर म्हणाले की, राहुल गांधी यांनी मागच्या वर्षी लंडन येथील भाषणात सावरकर आणि त्यांचे मित्र एका मुस्लिम व्यक्तीला मारहाण करत होते तेव्हा सावरकर यांना आनंद होत होता, असं विधान केलं होतं. त्यावर न्यायालयानं राहुल गांधी यांना समन्स दिलं आहे. 

हेही वाचा : 

  1. सावरकरांविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने राहुल गांधीं विरोधात ठाण्यात गुन्हा दाखल
  2. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू रणजित सावरकर राज ठाकरे यांच्या भेटीला

ABOUT THE AUTHOR

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.