यूपीएससी पास व्हा आणि 11 लाख रुपयांचे बक्षीस मिळवा! माजी आमदाराची भन्नाट ऑफर - UPSC pass prize of 11 lakhs offer - UPSC PASS PRIZE OF 11 LAKHS OFFER

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 3, 2024, 5:33 PM IST

बीड : आष्टी पाटोदा शिरूर हा दुष्काळी परिसर आहे. शाळेत शिक्षण घेणारे सर्व विद्यार्थी हे शेतकरी, गोरगरीब कुटुंबातील आहेत. आपल्या कर्तृत्वानं आई-वडिलांचा नावलौकिक वाढवण्यासाठी शिक्षण संस्थेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी आत्तापासूनच स्पर्धा परीक्षेची चांगली तयारी करावी. यूपीएससी पास होऊन यावे आणि संस्थेच्यावतीने 11 लाख रुपयांचे बक्षीस घेऊन जावे, अशी ऑफर बीडच्या भाजपाच्या माजी आमदार भीमराव धोंडे यांनी विद्यार्थ्यांना दिली. आपल्या शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेत शिक्षण घेणारे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेत कमी पडतात. याआधीही यूपीएससी पास होणाऱ्या विद्यार्थ्यांना 5 लाख रुपयांचे बक्षीस दिले जाईल, असं जाहीर केलं होतं. परंतु तेव्हा कोणीही जिंकलं नाही. भविष्यात काय व्हायचं ते आत्ताच ठरवा, असं माजी आमदार भीमराव धोंडे म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.