बुलडाणा जिल्ह्याला अवकाळी पावसाचा तडाखा; ज्वारी,गहू, हरभरा पिकांचे मोठे नुकसान - Rain In Buldhana
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/27-02-2024/640-480-20850298-thumbnail-16x9--unseasonal-rain.jpg)
![ETV Bharat Marathi Team](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/authors/maharastra-1716536262.jpeg)
Published : Feb 27, 2024, 12:23 PM IST
बुलडाणा Unseasonal Rain In Buldhana : राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा तडाखा पाहायला मिळत आहे. बुलडाणा जिल्ह्यात सोमवारी सायंकाळपासून मेघगर्जना, वादळी वाऱ्यासह पावसानं हजेरी लावली होती. अनेक भागात गारपीट झाल्यामुळं गहू, हरभरा, ज्वारी, शाळू मिरची या पिकांचं प्रचंड नुकसान झालंय. हाता-तोंडाशी आलेला घास निसर्गानं हिरावून घेतल्यानं शेतकरी हतबल झालाय. राज्य सरकारनं शेतकऱ्याच्या बांधावर न जाता तत्काळ हेक्टरी 50 हजार रुपयाची मदत द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी राज्य सरकारला केलीय. दोन दिवसापूर्वी बुलडाणा जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाची शक्यता हवामान खात्यानं व्यक्त केली होती. तर नांदुरा तालुक्यातील येरळी, खरकुंटी, पलसोडा, भोटा, हिंगणाह मलकापूर, जळगाव जामोद, सिंदखेड राजा, देऊळगाव राजा तालुक्यातील धोत्रानंदई, अंढेरा परिसरासह काही भागात अवकाळी पाऊस आणि गारपीट झाल्याची माहिती आहे.