मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या महिलेची चोरली साखळी, विरोध करणाऱ्या माणसावर चोरट्याकडून गोळीबार - cctv video of chain snatcher - CCTV VIDEO OF CHAIN SNATCHER
🎬 Watch Now: Feature Video
Published : Sep 4, 2024, 8:51 AM IST
हरिद्वार cctv video of chain snatcher : उत्तराखंडमधील हरिद्वार जिल्ह्यात साखळी चोरांनी नागरिकांमध्ये दहशत निर्माण केली आहे. हरिद्वारमधील ज्वालापूर कोतवाली परिसरात अवधूत मंडळ आश्रमाजवळ मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या महिलेला दुचाकीस्वारांनी लुटले. यावेळी महिलेला वाचवण्यासाठी आलेल्या एका व्यक्तीवरही हल्लेखोरानं थेट गोळीबार केला. या गोळीबारातून ती व्यक्ती थोडक्यात बचावली. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओही समोर आला आहे. मॉर्निंग वॉक करणाऱ्या महिलेच्या पाठीमागून एक व्यक्ती दुचाकीवर येतो. तो बाईक बाजूला उभी करून महिलेच्या मागे पळतो. महिलेला संशय आल्यानं ती चोरापासून दूर जात तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. परंतु काही अंतरानंतर त्या चोरट्यानं महिलेला पकडले. तिची गळ्यातील सोन्याची साखळी हिसकावून घेतली. त्यानंतर दुचाकीच्या दिशेनं चोरटा परतला. गुन्हेगाराच्या पाठीमागून एक व्यक्ती त्याला पकडण्यासाठी येतो. त्या व्यक्तीनं हल्लेखोराला पकडण्याचा प्रयत्न करताच त्या व्यक्तीवर चोरटा पिस्तुलानं गोळीबार करते. जीव वाचवण्यासाठी ती व्यक्ती रस्त्याच्या पलीकडे जाते. तिथून चोरट्यावर दगडफेक करतो. मात्र त्याचवेळी चोरटा दुचाकी सुरू करून तेथून पळून जाण्याचा प्रयत्न करतो. गुन्हेगाराला पकडण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीने या प्रकरणाची पोलिसांना माहिती दिली. या घटनेबाबत हरिद्वारचे एसपी सिटी स्वतंत्र कुमार म्हणाले की, "पोलिसांची काही पथके आरोपींच्या पकडण्यासाठी रवाना केली आहेत. आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल," असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.