उमेदवारीबाबत 29 मार्चला निर्णय घेणार; ज्योती मेटे लागल्या प्रचाराला - Lok sabha elections - LOK SABHA ELECTIONS
🎬 Watch Now: Feature Video
Published : Mar 26, 2024, 8:53 PM IST
बीड Beed Lok Sabha Elections : दिवंगत नेते विनायक मेटे (Vinayak Mete) यांच्या समाधी स्थळाचं दर्शन घेऊन, पत्नी तथा शिवसंग्रामच्या सर्वेसर्वा डॉक्टर ज्योती मेटे (Dr Jyoti Mete) यांनी आपली पुढची राजकीय भूमिका जाहीर केली आहे. तर, लोकसभा उमेदवारीविषयी 29 मार्चला निर्णय घेणार असल्याचं देखील त्यांनी यावेळी जाहीर केलं आहे. यावेळी त्या म्हणाल्या की, "गेल्या अनेक दिवसांची पोकळी भरून काढण्यासाठी आता मी ठरवलं आहे की यापुढे पूर्णपणे राजकीय काम करणार आहे." ज्योती मेटे या शिवसंग्राम भवन येथे आल्या असता, तेव्हा कार्यकर्त्यांनी "बीड का खासदार कैसा हो ज्योती मेटे जैसा हो" असं म्हणत घोषणाबाजी देखील केली आहे. त्यामुळं बीडमध्ये महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे विरुद्ध महाविकास आघाडीच्या उमेदवार म्हणून ज्योती मेटे यांची लढत होण्याची चर्चा आहे.