अहमदनगर-आष्टी-अमळनेर मार्गावर धावरी रेल्वे; लवकरच परळीपर्यंतचा मार्ग होणार सुरू - अहमदनगर आष्टी अमळनेर रेल्वे सुरू
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/29-02-2024/640-480-20869676-thumbnail-16x9-amalner-bhandyache-to-new-ashti-demu.jpg)
![ETV Bharat Marathi Team](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/authors/maharastra-1716536262.jpeg)
Published : Feb 29, 2024, 1:43 PM IST
बीड Amalner Bhandyache to New Ashti Train : जिल्ह्याच्या दळणवळणात मैलाचा दगड ठरणाऱ्या अहमदनगर- बीड- परळी या रेल्वे मार्गातील अमळनेर- आष्टी- अहमदनगर रेल्वे मार्ग सुरू झालाय. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून ही रेल्वे मार्गस्थ झाली. या उद्घाटन सोहळ्याला बीड जिल्ह्याच्या खासदार प्रितम मुंडे यांच्यासह स्थानिक राजकारणी व रेल्वेचे अधिकारी यांची उपस्थिती होती. अहमदनगर- बीड- परळी या रेल्वे मार्गाचे काम वेगाने सुरू आहे. लवकरच बीडकरांचे स्वप्न पूर्ण होईल, असा विश्वास खासदार प्रितम मुंडे यांनी व्यक्त केलाय. तसेच रेल्वे मार्गाचे पूर्ण काम झाल्यानंतर उद्घाटनाला देशांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत करण्याचा मानस खासदार मुंडे यांनी बोलून दाखवला.